आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI च्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती, 1983 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वेषन म्हणजेच सीबीआय या केंद्रीय तपास संस्थेच्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला हे 1983 सालच्या बॅचमधील आयपीएस अधिकारी आहे.

 

सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मा यांच्या बाजुने निकाल दिल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने त्यांची होमगार्डमध्ये उचलबांगडी केली होती. त्यानंतर वर्मा यांनी राजीनामा दिल्याने एम. नागेश्वर राव यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर उच्चाधिकार समितीने आता शुक्ला यांची नियुक्ती केली आहे. 

 

सीबीआयच्या संचालकांच्या निवडीसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली होती. बराच वेळ चाललेल्या या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून समितीने तीन नावांची शिफारस केली होती. त्यानंतर शनिवारी शुक्ला यांच्या नावाची घोषणा झाली. 

 

सुप्रीम कोर्टाने सीबीआयच्या संचालकांच्या नियुक्तीस होणाऱ्या उशीर प्रकरणी शुक्रवारी विचारणा केली होती. तसेच लवकरात लवकर नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. 
 

बातम्या आणखी आहेत...