आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rishi Neetu Will Again Appear On Screen As Couple, First Interview After Rishi Kapoor Returns From US

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋषी-नीतू यांची जोडी पुन्हा पडद्यावर, अमेरिकेतून परतल्यानंतर पहिल्यांदा ऋषी कपूर यांनी दिली विशेष मुलाखत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये ११ महिन्यांपर्यंत उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर आता भारतात परत आले आहेत. भारतात येताच त्यांनी आपली अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ते 'द बॉडी'च्या प्रोमोशन्समध्ये व्यग्र आहेत, परंतु लवकरच ते पत्नी नीतू कपूरसोबत आणखी एका चित्रपटावर काम सुरू करणार आहेत. दिव्य मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी आगामी चित्रपटांबाबत सांगितले.या चित्रपटामध्ये दिसतील सोबत


आपली पत्नी नीतू कपूरसोबत ते ज्या चित्रपटात सोबत दिसणार आहेत तो चार वर्षांपूर्वी आलेला बंगाली 'बेला शेषे'चा रिमेक आहे. या चित्रपटासंदर्भात ऋषी सांगतात, याची कथा खूपच सुंदर आहे. यामध्ये लग्नाला ४० वर्षे झाल्यानंतर एका व्यक्तीला आपल्या पत्नीकडून घटस्फोट हवा असतो. यामागे काय कारणे आहेत, यावरच हा चित्रपट आधारित आहे. मी सातत्याने अशाच प्रकारच्या वेगळ्या चित्रपटांच्या शोधात आहे.माझ्या एकट्याच्या नावावर प्रेक्षक येणार नाहीत...


पुनरागमनाबाबत म्हणाले, आपल्या पुनरागमनाबाबत ऋषी म्हणाले, 'मला काम करत राहायला आवडते. वेळेवर सेटवर जाणे आणि काम करत राहण्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. मला वेळेचे खूप महत्त्व आहे. तथापि, आजच्या स्टार्सकडे वेळ नसतो. एक व्यक्ती आहे, पण त्यांचे नाव घेणार नाही. ते तर कधीच दिलेल्या वेळेत येत नाहीत. योगायोग म्हणजे त्या व्यक्तीचा चित्रपटही हिट होतो. मी तसा नाही. मी प्रत्येक प्रकारचे चित्रपट करण्यास तयार आहे. फक्त संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असेल, असे चित्रपट मी करत नाही. कारण आजच्या तारखेत केवळ माझ्या एकट्याच्या नावावर प्रेक्षक येणार नाहीत. चित्रपटात एक स्टार असणेही गरजेचे आहे. जसे '१०२ नॉट आउट'मध्ये माझ्यासोबत अमिताभ बच्चन साहेब होते. 'मुल्क'मध्ये तापसी पन्नू होती. अशाच प्रकारे चित्रपट करण्याची इच्छा आहे. वडील किंवा आजोबांचे पात्र नियमित साकारणे माझ्याकडून शक्य नाही.'भारतात कलावंतांचा योग्य सन्मान केला जात नाही


ऋषी यांनी इतर देशांची भारताशी तुलना करत हेदेखील सांगितले की, 'भारतात कलावंतांचा आदर केला जात नाही. अमेरिकेत एल्विस प्रेस्ले, मायकल जॅक्सन यांची नावे काही ठिकाणांना देण्यात आली आहेत. त्यामुळेच तेथील युवा त्यांचे कार्य नेहमीसाठी आठवणीत ठेवतील. भारताबाबत बोलताना ते म्हणाले की, इथे कोणत्याही कलावंताचे नाव कोणत्याच ठिकाणाला देण्यात आलेले नाही. भावी पिढी या लोकांना कशी ओळखेल? राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या योगदानाबाबत जगभरातील लोकांना माहीत आहे, परंतु माझ्या देशामध्ये त्यांचा तेवढा सन्मान का केला जात नाही?'दोघांनीही ४४ वर्षे सोबत केले अनेक चित्रपट


हे दृश्य ऋषी कपूर आणि नीतू कपूर (सिंह) यांनी मिळून केलेला चित्रपट 'खेल-खेल में'मधील आहे. १९७५ मध्ये आलेल्या या चित्रपटाला ४४ वर्षे झाली आहेत.सरकारविरोधी प्रतिक्रिया दिली म्हणून...


'बाला' आणि 'विकी डोनर'सारखे चित्रपट बनतात आणि त्यांचे कौतुक केले जाते तेव्हा मला खूप आनंद होतो. आमच्या काळातील एका टप्प्यात प्रत्येक तिसऱ्या चित्रपटात चार गाणी, तीन रेप सीन, सुरुवातीला नायक-नायिका एकमेकांपासून वेगळे होणे आणि शेवटी त्यांची भेट होणे आदी स्क्रिप्टमध्ये असायचेच. आज तशा प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षक कदापि पसंत करणार नाहीत. तेव्हाच्या काळात जर 'विकी डोनर' आला असता तर त्यावर बंदी घातली असती, हेदेखील महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. 'मुल्क'बाबत बोलताना ते म्हणाले, याला तर राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळू शकत होते. मात्र, अनुभव (सिन्हा) हे सरकारच्या विरोधात प्रतिक्रिया देत असल्याचे मी ऐकले आहे. कदाचित त्यामुळेच याला नामांकन मिळू शकले नसावे.
6 चित्रपटांत ऋषी-नीतू यांनी याापूर्वी काम केले आहे.
06 वर्षांपूर्वी 'बेशर्म' मध्ये दिसले होते एकत्र
39 वर्षांची आयुष्याची साथ
१९८० मध्ये झाले होते लग्नजोमाने लागले कामाला


ऋषी यांनी भारतात येताच कामे करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ते 'द बॉडी'च्या प्रोमोशन्समध्ये व्यग्र आहेत. न्यूयॉर्कला जाण्यापूर्वी जो चित्रपट अपूर्ण राहिला होता, त्याची शूटिंग ते १ डिसेंबरपासून सुरू करणार आहेत. या चित्रपटाचे शीर्षकही अद्याप निश्चित झालेले नाही.