आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीच लोकांची नम्रता नेहमी दुःखदायी असते, ऋषी वाल्मिकी यांच्या अशाच 10 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रेता युगामध्ये महर्षी वाल्मिकी यांनी रामायण ग्रंथाची रचना केली. या ग्रंथाच्या आधारे गोस्वामी तुलसीदास यांनी श्रीरामचरितमानास ग्रंथाची रचना केली. रामायणात श्रीराम आणि रावणाच्या कथा माध्यमातून वाल्मिकी यांनी सुखी आणि यशस्वी जीवनाचे विविध सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचे पालन केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. येथे जाणून घ्या, रामायणात सांगण्यात आलेले असेच काही सूत्र...


1. या जगात कोणतेच काम अवघड नाही, जर उत्साहाने काम केले तर अवघडातील अवघड कामही यशस्वी होऊ शकते.


2. चंदनाचे लाकूड शीतलता प्रदान करते, परंतु हे लाकूड एकमेकांवर रगडल्यास यामध्ये आग लागते ठीक अशाचप्रकारे खूप अवज्ञा झाल्यास ज्ञानी लोकांनाही क्रोध येतोच.


3. संत समाजाला दुःखापासून दूर ठेवण्यासाठी कष्ट करतात याउलट दुष्ट लोक इतरांना दुःख देण्यासाठी संघर्ष करत राहतात.


4. दुःख आणि अडचणी जीवनातील असे दोन पाहुणे आहे, जे आमंत्रणाशिवाय येत राहतात.


5. आपल्या जवळपास कठोर बोलणारे लोक फार कमी असतात परंतु हे लोक नेहमी आपल्या हिताचे सल्ले देतात.


6. जीवनात नेहमी सुखच मिळावे हे आवश्यक नाही, कधीकधी दुःखही येत राहतात.


7. आपला अहंकारच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. ही भावना सोन्याचा हारही मातीचा बनवून टाकते. रावणाचा अहंकारामुळेच प्रभू श्रीरामाकडून अंत झाला.


8. आपली इच्छाशक्ती मजबूत असल्यास आपण कोणतेही काम सहजपणे पूर्ण करू शकतो.


9. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा मोठी आहे. यामुळे आई आणि मातृभूमीचा नेहमी सन्मान करावा.


10. नीच लोकांची नम्रता खूप दुःखदायी असते. ज्याप्रकारे अंकुश, धनुष्य, साप आणि मांजर वाकूनच वार करतात. 

बातम्या आणखी आहेत...