आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश हत्या प्रकरणी आरोपी देवडेकरला झारखंडमध्ये अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद - कन्नड पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने फरार आरोपी ऋषिकेश देवडेकर याला झारखंडमध्ये कतरासमधून अटक केली. कतरासमध्ये खेमका पेट्रोल पंपावर तो काम करत होता. तसेच उद्योगपती खेमका यांच्या निवासस्थानी तो केअरटेकर म्हणूनही काम पाहत होता. देवडेकर हा मूळ औरंगाबादचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कर्नाटक एसआयटीच्या सहा सदस्यीय पथकाने गुरुवारी खेमका यांच्या निवासस्थानी छापा टाकला.  यात तेव्हा ऋषिकेश सापडला. कोर्टात हजर केल्यानंतर ऋषिकेशला बंगळूरु येथे नेले जाईल. गोव्यातील एका मित्राने ऋषिकेशची खेमका यांच्याकडे शिफारस केल्याची माहिती समोर येत आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक झाली आहे. ऋषिकेशच्या अटकेमुळे या हत्येतील आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...