ऋषिपंचमी / ऋषिपंचमी : नाशिकच्या राम कुंडावर महिलांनी केली गर्दी, कळत-नकळतपणे झालेले पाप नष्ट करण्यासाठी केले जाते हे व्रत

या व्रतामध्ये मुख्यतः सप्तऋषी  आणि अरुंधती यांचे पूजन केले जाते

रिलिजन डेस्क

Sep 03,2019 05:17:29 PM IST

नाशिक- भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ऋषिपंचमी म्हणतात. या दिवशी महिला व्रत करतात. हे व्रत कळत-नकळतपणे झालेल्या पापांचे दोष दूर करण्यासाठी केले जाते. यावर्षी हे व्रत 3 सप्टेंबरला मंगळवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार हे व्रत महिला प्रधान आहे. स्त्रियांकडून रजस्वला अवस्थेत घरातील भांडे आणि इतरही वस्तुंना स्पर्श झाल्याने लागलेले पाप दूर करण्यासाठी हे व्रत केले जाते. या व्रतामध्ये मुख्यतः सप्तऋषी आणि अरुंधती यांचे पूजन केले जाते. यामुळे याला ऋषिपंचमी असे म्हणतात. स्त्रियांनी या दिवशी नांगराने उत्पन्न धान्य आणि भाज्या खाऊ नयेत. ऋषिंपचमीच्या निमित्ताने नाशिकच्या राम कुंडावर महिलांनी एकच गर्दी केली.

राम कुंडावरील महिलांची गर्दी


व्रत विधी -
- या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी सकाळपासून दुपारपर्यंत उपवास करून एखाद्या नदीजवळ जावे. तेथे आघाड्याच्या काडीने दात स्वच्छ करून अंगावर माती लावून स्नान करावे.


- त्यानंतर पंचगव्य (गायीचे शेण, मूत्र, दूध, दही आणि तूप) सेवन करावे. त्यानंतर घर येऊन पूजेचे स्थान शेणाने सारवून घ्यावे.
- त्यावर मातीचा किंवा तांब्याचा कलश स्थापन करून त्यावर कपडा टाकून तांदूळ ठेवावेत.


- संकल्प घेण्यासाठी खालील मंत्राचा उच्चार करावा...
गोत्र (स्वतःच्या गोत्राचा उच्चार करावा) अहं (नावाचा उच्चार)
मम आत्मनो रजस्वलावस्थायां गृहभाण्डादिस्पर्शदोषपरिहारार्थं अरुन्धतीसहितसप्तर्षिपूजनं करिष्ये।


- कलशाजवळ अष्टदल कमल काढून त्यावर कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र,गौतम, जमदग्नी, तसेच वशिष्ठ हे सप्तऋषी आणि अरुंधती यांच्यासाठी आठ सुपाऱ्या मांडून पूजा करावी.


- पूजा झाल्यानंतर कलश आणि पूजन सामग्री एखाद्या ब्राह्मणाला द्यावी. अन्नदान करून स्वतः जेवण करावे.


- अशाप्रकारे व्रत केल्याने महिलांचे वर्षभरातील कळत-नकळतपणे झालेल्या पापांचे दोष दूर होतात.

X
COMMENT