आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी जेनेलियासोबत लॉन्ग ड्राइववर निघाला होता रितेश देशमुख, ड्रायव्हिंग करता करता बॉलिवूडच्या गाण्यावर धरला होता ताल, पण एका चुकीमुळे होत आहे ट्रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्नी जेनेलिया डिसूजासोबत लॉन्ग ड्राइववर गेला होता. रितेश कार ड्राइव करत आहे आणि त्यावेळीच त्याने बॉलिवूडच्या गाण्यावरही ताल धरला होता. एवढेच नाही, तो आपला हा मस्ती करतानाचा व्हिडीओ बनवत आहे. कार चालवताना व्हिडीओ बनवत आहे हे पाहून त्याचे फॅन्स त्याला सल्ला देत आहेत.  

सोशल मीडियावर येत आहेत अशा कमेंट्स...
एका यूजरने लिहिले आहे, "सरजी कार चालवताना मोबाइलचा वापर करू नये." आणखी एका यूजरची कमेंट आहे, "भाऊ समोर पाहून चालवत जा कार, मी समोरून गेलो होतो...मारता मारता वाचलो. तुझ्यामुळे केहाड्या निष्पाप माणसाचा जीवही जाऊ शकतो." या व्हिडीओला 13 तासांच्या आतच 8 लाखांपेक्षा जास्त लोकानी पाहिले आहे. खूप दीर्घ काळानंतर रितेश आणि जेनेलिया कुठेतरी सोबत दिसले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर रितेश शेवटचे फिल्म 'टोटल धमाल' मध्ये दिसला होता, जी बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरली होती. 

बातम्या आणखी आहेत...