आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः राज कपूर यांच्या कन्या आणि ऋषी कपूर, रणधीर कपूर यांची बहीण रितू नंदा यांचे मंगळवारी निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. गेल्या आठ वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रणधीर कपूर यांनी एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला सांगितल्यानुसार, ‘रितू नंदा यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. आम्ही सर्वजण दिल्लीत आहोत आणि दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.’
रितू या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या विहिण होत्या. त्यांचा मुलगा निखिल नंदासोबत अमिताभ यांची कन्या श्वेता बच्चनचे लग्न झाले आहे. नीतू कपूर आणि त्यांची कन्या रिद्धिमा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रितू यांना श्रद्धांजली वाहिली.
रितू यांचा जन्म 1948 साली झाला होती. त्या उद्योजिका होत्या. एस्कॉर्ट्स ग्रुपचे मालक राजन नंदा यांच्याशी त्यांनी 1969 मध्ये लग्न केले होते. राजन नंदा यांचे 2018 मध्ये निधन झाले.
गिनीज बुकमध्ये आहे नावाची नोंद
रितू नंदा यांच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये आहे. एकाच दिवसांत 17000 पेन्शन पॉलिसीज विकण्याचा विक्रम त्यांनी केला होता. 80 च्या दशकात त्यांनी एलआयसीच्या एजंट म्हणून काम सुरु केले होते. काही वर्षे हे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची खासगी विमा कंपनी सुरु केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.