आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ritu Nanda Passed Away: Amitabh Bachchan And Neetu Kapoor Mourned On The Sad News

विहिणबाई रितू नंदांच्या निधनामुळे अमिताभ झाले शोकाकूल, नीतू आणि त्यांची मुलगी रिद्धिमा यांनीही व्यक्त केले दुःख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः राज कपूर यांच्या कन्या रितू नंदा यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी  9.30 वाजता आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, "माझ्या विहिण आणि श्वेताच्या सासूबाई रितू नंदा यांचे रात्री 1.15 वाजता अचानक निधन झाले. मी सध्या संवाद साधू शकत नाही. मी प्रवास करीत आहे."


अमिताभ बच्चन रितू यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. 2013 पासून रितू कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते.

नीतू कपूर आणि त्यांची मुलगी रिद्धिमा यांनीही दुःख व्यक्त केले
रितू यांच्या वहिनी  आणि ऋषी कपूर यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, "माझी सर्वात प्रिय ... तुमच्या आत्म्याला शांती मिळो."

नीतू आणि ऋषी यांची कन्या रिद्धिमाने, आत्या तुमची कायम आठवण येईल, अशा शब्दांत रितू नंदा यांना श्रद्धांजली वाहिली.