आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या बिगरमानांकित ऋतुजा भोसलेची उपांत्य फेरीत धडक, स्लोव्हाकियाच्या प्रथम मानांकित तमारा झिडनसेकला 2-1 हरवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भारताच्या बिगरमानांकित ऋतुजा भोसलेने विजयी घोडदौड कायम ठेवत उपांत्य फेरी गाठली आहे. कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी झालेल्या सामन्यात ऋतुजाने स्लोव्हाकियाच्या प्रथम मानांकित तमारा झिडनसेकचा चुरशीच्या सामन्यात २-१ असा पराभव केला. 

 

सामन्याच्या पहिल्या सेट मध्ये ऋतुजाला स्थिर व्हायला वेळ लागला. त्यात तिच्या खांद्याचा स्नायू दुखावल्यामुळे मेडिकल ब्रेक घ्यावा लागला. पहिल्या सेटमधील २-६ अशा पराभवानंतर दुसऱ्या सेट पुनरागमन करत तिने आक्रमक खेळ करताना जबरदस्त ग्राउंड स्ट्रोकच्या जोरावर ६-४ ने आपल्या नावे केला. त्याचप्रमाणे तिसऱ्या सेट मध्ये भेदक सर्व्हिस, चपळता, मानसिक संतुलन आणि फिटनेसच्या जोरावर तिने निर्णायक सेट ६-३ ने जिंकला. 


आज एकेरीचे उपांत्य व दुहेरीचा अंतिम सामना : स्पर्धेचे एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने शुक्रवारी सकाळी १०.३० पासून, तर दुहेरीचा अंतिम सामना दुपारी तीन वाजता खेळवला जाणार आहे. दुहेरीत प्रथम मानांकित ग्रे सारह बेथ (इंग्लंड) व यशीना एकेटरीना (रशिया) यांच्यात सामना होईल. इनोई मायबी (जपान) आणि लु जीआ जिंग (चीन) यांच्यात अंतिम लढत होणार आहे. 

 

ऋतुजाने संधीचे सोने केले 
ऋतुजा ही सोलापूर जिल्ह्यातील माळीनगरची असून तिला या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेला असलेल्या प्राप्त अधिकारानुसार मुख्य फेरीत थेट प्रवेश (वाइल्ड कार्ड) देण्यात आला होता. ऋतुजाने दिलेल्या संधीचे सोने करून दाखवले. -राजीव देसाई, स्पर्धा सचिव 

 

महिला दुहेरी : 
ग्रे सारह बेथ (इंग्लंड) व एकेटरीना (रशिया) (१) वि. वि. रेका लुका (हुंगेरी) वलेरिया (युक्रेईन) ६-४, ५-७, १०-४. इनोई मायबी (जपान) व लु जीआ जिंग (चीन) वि. वि. ऋतुजा भोसले (भारत) झांग काय लिन (चीन) ४-१ (दुखापतीमुळे). 

बातम्या आणखी आहेत...