आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षीय मुलीने दुबईत वर्गणी जमवत वाटले शहापूरच्या 250 मुलींना वर्षभराचे सॅनिटरी पॅड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महिलांची मासिक पाळीच्या काळातील कुचंबणा आणि सॅनिटरी नॅपकिन्सबाबतच्या जनजागृतीवर आधारित 'पॅडमॅन' हा चित्रपट पाहून दुबईस्थित १३ वर्षीय रिवा तुळपुळे या कन्येने दुबईत वर्गणी जमवून ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेतील २५० आदिवासी मुलींना वर्षभर पुरेल इतके सॅनिटरी नॅपकिन्स भेट दिले. 

 

रिवा ही मूळची शहापूरचीच असून दुबईमत आठव्या वर्गात शिकत आहे. या उपक्रमाबाबत ती सांगते, ' चित्रपट पाहून भारतातील मुली मासिक पाळीच्या काळात किती कुचंबणा सहन करतात, याची जाणीव झाली. त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स भेट देण्याची कल्पना सुचली. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे दुबईला आले असताना मी त्यांना यासंदर्भात सांगितले. त्यांनी मला यासाठी प्रोत्साहित केले. 

 

आमदार डावखरेंकडून कौतुक : 
शनिवारी आमदार डावखरे यांच्या 'समन्वय प्रतिष्ठान'कडून शहापुरात शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डावखरेंनी तिच्या या उपक्रमाचे ट्विटरवरून कौतुकही केले आहे. 'आठवीत शिकणाऱ्या रिवाने केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे,' असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 

दुबईतील लोकांना केले वर्गणीसाठी आवाहन 
महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा निश्चय रिवाने केला. दिवाळीनंतर लागलीच ती यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी सरसावली. तिने दुबईतील लोकांना या उपक्रमास वर्गणी देण्याचे आवाहन केले आणि तिच्या आवाहनावरून लागलीच पुरेशी रक्कमही गोळा झाली. या रकमेतून रिवाने सुमारे २५० मुलींना तब्बल वर्षभर पुरतील इतके सॅनिटरी नॅपकिन्स घेतले आणि तिचे शहापूर भागातील शाळेत शनिवारी त्यांचे वाटपही केले. 

 

बातम्या आणखी आहेत...