आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमणगंगा, तापीचे समुद्रात जाणारे पाणी खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दमणगंगा अाणि तापी नदी या देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी नदीजाेड प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. महाराष्ट्राचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे बैठकीला उपस्थित होते. दमनगंगा अाणि तापी नदीद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी खान्देश अाणि मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात अाली. 

दमणगंगा, तापी नदीजोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारे पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा हो आहे. पावसाचे अतिरिक्त वाया जाणारे पाणी, या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात वळवले जाणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतीसाठीही उपयोग होईल. बैठकीत बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यास नाबार्डकडून मिळणाऱ्या कर्जमदतीबाबतही या वेळी सकारात्मक चर्चा झाली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्प आणि बळीराजा जलसंजीवनी योजना यशस्वीपणे राबवल्या जातील, असा विश्वास बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

 

अपूर्ण सिंचन प्रकल्पही पूर्ण करणार 
बळीराजा जलसंजीवनी योजनेवरही बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व अवर्षणप्रवण भागातील एकूण ११२ बांधकामामधील रखडलेले प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून पूर्ण केले जातील. त्यामुळे प्रकल्पांच्या भागातील शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...