आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींसमोर गुडघे टेकले नाही, म्हणूनच लालू आज जेलमध्ये! मायावतींचा पदस्पर्श करून तेजस्वींनी घेतला आशीर्वाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर भारतात आघाड्यांच्या चर्चा सुरू असताना बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी बसप अध्यक्ष मायावतींची भेट घेतली. त्यांनी रविवारी मायावतींची भेट घेऊन उत्तर प्रदेशात झालेल्या बसप आणि सप आघाडीला समर्थन दिले. या दरम्यान तेजस्वींनी मायावतींचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतल्याचा फोटो सुद्धा समोर आला आहे. आपले वडील आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसमोर गुडघे टेकले नाहीत. त्यामुळेच, ते सध्या तुरुंगात आहेत. सोबतच, बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशात सुद्धा स्थानिक पक्षांनी एकत्रित यावे अशी लालूंची इच्छा असल्याचे तेजस्वी म्हणाले आहेत.


आरक्षण संपवण्याचा कट रचला जातोय -तेजस्वी
- तेजस्वी यादव आणि मायावती यांच्या भेटीत जवळपास एक तास चर्चा झाली. यानंतर रात्री 11 च्या सुमारास दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. यात तेजस्वी म्हणाले, सर्वात लहान आहे म्हणूनच मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. यानंतर अखिलेश यादव यांची देखील भेट घेणार आहे. तेजस्वींनी मायावतींना जन्मदिनाच्या अॅडव्हांस शुभेच्छा दिल्या आहेत.
- यासोबतच तेजस्वींनी भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा देखील समाचार घेतला. केंद्र सरकारकडून आरक्षण संपवण्याचा कट रचला जात आहे. देशात एकप्रकारे अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राज्यघटनेशी छेडछाड केली जात आहे. घटनात्मक संस्थांवर हुकूमशाही गाजवण्याचा प्रयत्न होत आहे. लालूंनी मोदींसमोर गुडघे टेकण्यास नकार दिला. त्यामुळेच आज ते तुरुंगात आहेत असा दावा सुद्धा तेजस्वी यांनी केला आहे.

- आघाड्यांचे सत्र सुरू असताना बिहारमध्ये आपणही मायावतींना पाठिंबा देणार किंवा आघाडी करणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. परंतु, त्यावर आता नव्हे, तर योग्य वेळी उत्तर देणार असे तेजस्वींनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...