Home | Flashback | RK Studio Silver Jublee Video With Raj Kapoor And Other Bollywood Stars

Video : 70 वर्षे जुन्या RK स्टूडिओच्या सिल्व्हर ज्युबली पार्टीत पोहोचले होते अनेक बॉलिवूड स्टार्स, आता होतेय विक्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 03:39 PM IST

राज कपूर यांच्या या स्टूडिओला 25 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

 • आर. के. स्टुडिओ आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार हा स्टुडिओ आहे. कित्येक सुपरहिट चित्रपट या स्टुडिओच्या साक्षीनं तयार झाले आहे. ‘शो मॅन’ राजकपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली. जवळपास 70 वर्षांहून अधिक काळ स्वप्ननगरी मुंबईतील चेंबूर भागात मोठ्या दिमाखात हा स्टुडिओ उभा आहे. या स्टुडिओची सध्याची विक्री किंमत ही जवळपास 500 कोटींच्या घरात असल्याचं समजत आहे. हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय नुकताच कपूर कुटुंबियांनी जाहीर केला आहे. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न हे फारच कमी आहे तर त्याच्या देखभालीचा खर्च मात्र न परवडण्यासारखा आहे म्हणूनच हा स्टुडिओ विकत असल्याचं ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूरनं आधीच स्पष्ट केलं आहे.

  सिल्व्हर ज्युबली निमित्त झाली होती शानदार पार्टी

  राज कपूर यांच्या या ऐतिहासिक स्टूडिओला 25 वर्षे (सिल्व्हर ज्युबली) पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स पोहोचले होते. पार्टीत राजेश खन्ना, डिंपल कपाडिया, अरुणा ईरानी, निरूपा रॉय, रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि लता मंगेशकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी स्वतः राज कपूर यांनी गेटवर उभे राहून पाहुण्याचे स्वागत केले होते.

  आगीत नष्ट झाल्या अमुल्य गोष्टी...

  चेंबूरमधील 2 एकर परिसरात असलेल्या या स्टुडिओचं मुल्य हे पाचशे कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. स्टुडिओची विक्री झाल्यानंतर त्यातून येणारा नफा स्टुडिओशी संबधीत प्रत्येकाला देण्यात येणार असल्याचं कपूर कुटुंबियांनी आधीच स्पष्ट केलं आहे. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर या वास्तूचे आणि त्यात संग्रहीत केलेल्या अमुल्य आठवणींचंही नुकसान झाले त्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्च कपूर कुटुंबियांना परवडत नव्हता. तसेच अनेक कलाकारांनीही या स्टुडिओकडे पाठ फिरवली होती म्हणूनच काळजावर दगड ठेवून आर. के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतल्याचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी स्पष्ट केले आहे.

  एकेकाळी गहाण ठेवावा लागला होता स्टुडिओ....
  एककाळ असा आला होता, जेव्हा राज कपूर यांना हा स्टुडिओ गहाण ठेवावा लागला होता. 'मेरा नाम जोकर' या चित्रपटासाठी राज कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. त्यामुळे त्यांच्यावर हा स्टुडिओ गहाण ठेवायची वेळ आली होती. रिलीजनंतर चित्रपट फ्लॉप झाला होता, त्यामुळे राज कपूर यांना मोठा धक्का बसला होता. पण नंतर राज कपूर यांनी ऋषी कपूर यांन लाँच करण्यासाठी 'बॉबी' हा चित्रपट बनवला, तो हिट झाला आणि त्यानंतर राज कपूर यांनी हा स्टुडिओ कर्जमुक्त केला होता.

  1948 मध्ये झाली होती स्टुडिओची स्थापना...
  शो-मॅन राज कपूर यांनी 1948 साली आरके स्टूडिओचा पाया ठेवला होता. या स्टुडिओच्या बॅनरमध्ये बनलेला 'आग' चित्रपट फ्लॉप ठरला होता. पण त्यानंतर आलेला 'बरसात' सुपरहिट झाला. स्टुडिओचा लोगो राज कपूर आणि नर्गिस यांच्या पावसातील पोजपासून तयार करण्यात आला होता. आरके स्टुडिओने अनेक क्लासिक चित्रपटांची निर्मिती केली. यामध्ये 'आग', 'बरसात', 'आवारा', 'श्री 420', 'संगम', 'मेरा नाम जोकर', 'बॉबी' और 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटांचा समावेश आहे.

Trending