Home | National | Other State | RLD Chief Ajit Singh Had To Took Off Shoes To Share The Stage With Mayawati Photos

लोकसभा निवडणूक 2019 : RLD अध्यक्ष अजित सिंहांना पाळावा लागला 'प्रोटोकॉल', मायावतीसोबत मंचावर बसण्यासाठी उतरवावे लागले बुट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 03:29 PM IST

'बहनजीं'च्या निकटवर्तीयांनी सांगितले यामागचे कारण

 • RLD Chief Ajit Singh Had To Took Off Shoes To Share The Stage With Mayawati Photos


  लखनऊ (उत्तर प्रदेश) - लोकसभा निवडणुकीसाठी सपा-बसपा आणि आरएलडी यांनी गठबंधन केले आहे. रिपोर्ट्सनुसार यावेळी मायावती गठबंधनाच्या मुख्य चेहरा आहेत. महागठबंधनाच्या रॅली, कार्यक्रमपासून ते स्टेचवर कोण कोठे बसणार, कोण कधी बोलणार हे सर्व मायावती ठरवत आहेत. एका रिपोर्टनुसार मागील आठवड्यात देवबंद येथे पार पडलेल्या महागठबंधनाच्या रॅलीत मंचावर आरएलडीचे अध्यक्ष अजित सिंह यांना पादत्राणे काढावे लागले होते.

  आपल्यासमोर कोणीही बुट घातल्याचे मायवतींना आवडत नाही
  पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सहारनपूरच्या देवबंद येथे पार पडलेल्या महागठबंधन रॅलीत मायावतीचे नियम पाहावयास मिळाले. आरएलडीचे अध्यक्ष अजित सिंह यांनी मंचावर चढण्यास सुरुवात केली असता बसपाचे को-ऑर्डिनेटरने त्यांनी बुट काढण्यास सांगितले. मंचावर कोणीही मायावतींसमोर बुट घातल्याचे त्यांना आवडत नसल्याचे को-ऑर्डिनेटरने सिंह यांना सांगितले. यानंतर सिंह यांनी बुट काढून मंचावर प्रवेश केला.


  मुख्यमंत्री असताना तयार केले होते नियम

  मायावती मुख्यमंत्री असताना कोणताही मंत्री किंवा अधिकारी बुट परिधान करून त्यांची भेट घेऊ शकत नव्हता. 'बहनजीं'ना धुळीची अॅलर्जी असल्यामुळे असा नियम तयार करण्यात आल्याचे मायावतींच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Trending