आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकण रेल्वेच्या धर्तीवर लवकरच सुरू होणार बाळे स्थानकावरून 'रो-रो सेवा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कोकण रेल्वेच्या धर्तीवर लवकरच बाळे स्थानकावरून रो -रो अर्थात रोल ऑन व रोल ऑफ ही रेल्वे मालवाहतूक सेवा सुरू होणार आहे. बाळे स्थानकावरून कांद्यानी भरलेला ट्रक विशिष्ट अशा मालगाडीवरून ठेवून वाहतूक केली जाणार आहे. नुकतेच सोलापूर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोकण रेल्वे येथे जाऊन या बाबत सविस्तर अशी माहिती व अभ्यास केला आहे. 


सोलापूर विभागाने याला मंजुरी दिली असून बाळे स्थानकावर यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाय योजना केल्या जाणार आहेत. बाळे स्थानकावरून बंगळुरू येथील नेलमंगला या स्थानकापर्यंत कांद्याची वाहतूक केली जाणार आहे. ही वाहतूक ट्रकमध्ये कांदा गोळा करून तो ट्रकच मालगाडीवर ठेवला जाणार आहे. या साठी बाळे स्थानकावर रॅम्प बांधण्यात येणार आहे. सोमवारी या संदर्भात अधिक चर्चा करण्यासठी हंुडेकरी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...