Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | road accident four dead aurangabad

नागपूर-मुंबई महामार्गावर अपघात, कार-कंटेनर धडकेत औरंगाबादचे चौघे ठार

प्रतिनिधी | Update - Feb 27, 2019, 09:13 AM IST

कार व मालवाहू कंटेरनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघाचा जागीच मृत्यू झाला.

  • road accident four dead aurangabad

    वैजापूर/ औरंगाबाद - नागपूर - मुंबई महामार्गावरील भग्गाव शिवारात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कार व मालवाहू कंटेरनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघाचा जागीच मृत्यू झाला. एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये चिकलठाणा येथील रहिवासी व संत भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अध्यक्ष मदन रोघोजी ढाकणे (४५), औरंगाबादेत रामनगर भागातील रहिवासी व भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविता विलास घुले (४०), त्यांचे पती विलास पंढरीनाथ घुले (४५) व चालक दिनेश बाजीराव बकाल यांचा समोवश आहे. मदन यांच्या पत्नी मीरा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


    ढाकणे यांच्या संत ज्ञानेश्वर अकादमीची नवी वास्तू उभी आहे. त्याच्या उद््घाटनसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना आमंत्रित करण्यासाठी ढाकणे दाम्पत्य व घुले दाम्पत्य रविवारी रात्री कारने मुंबईला गेले होते. औरंगाबादकडे परतताना वैजापूरजवळ भग्गाव शिवारात रात्री साडेअकराच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनगरने कारला समोरून धडक दिली. या भीषण धडकेत कारचा पूर्ण चुराडा झाला.


    भावासोबत अखेरचे बोलणे झाले
    ढाकणे मुंबईहून निघाल्यानंतर परतत असताना बंधू गंगाधर ढाकणे यांच्याशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले. कॉलवर त्यांनी आम्ही रात्री बारापर्यंत घरी पोहचू्, असे भावाला सांगितले. मात्र, हे त्यांचे शेवटचे बोलणे ठरले.

Trending