आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Road And Tyres Are Melting After Heatwave In Australia Thousand Of Animals Also Died 

या देशात तापमान एवढे वाढले की रस्ते आणि टायर वितळू लागले, हजारो प्राण्यांचा एकाचवेळी झाला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅडिलेड - एकिकडे अर्ध्या जगामध्ये प्रचंड थंडीचा कडाका अनुभवायला मिळत असतानाच एक असा देश आहे, ज्याठिकाणी प्रचंड गर्मीने रस्ते वितळायलाल लागले आहेत. आम्ही बोलतोय ऑस्ट्रेलियाबाबत. या देशात सध्या प्रचंड गर्मी पसरलेली आहे. येथील तापमान 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुले रस्त्यावरील डांबर वितळू लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार वेगाने धावणाऱ्या गाड्यांचे टायरहू फुटून डांबराला चिटकायला लागले आहेत. सर्वात वाईट अवस्था प्राण्यांची झाली आहे. उकाड्यामुळे हजारो प्राण्यांचा एकाचवेळी मृत्यू झाला आहे. 


डेली मेलच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणी तापमान 48 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. भारतात उन्हाळ्यात काही ठिकाणी 45 डीग्री तापमानही फार समजले जात नाही. पण याठिकाणी एवढ्याच तापमानाने सर्वांची अस्था वाइट झाली आहे. गरम हवेमुळे येथे ओझोन अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


पुढे वाचा, थंडीच्या ठिकाणांकडे धावताहेत लोक.. सरकारने जारी केला इशारा.. 

बातम्या आणखी आहेत...