आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल येथे रास्ता रोको, अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांसाठी आंदोलक रस्त्यावर; आवर घालताना पोलिसांची झाली दमछाक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- शहरातील मुख्य रस्त्यावर सोमवारी दुपारी सव्वा दोन तास रास्ता रोको करण्यात आला होता. तालुक्यातील परसाडे येथील अतिक्रमण क्षेत्रावर राहणाऱ्या आदिवासी अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना घरकुलासह इतरही योजनांचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी हे रास्ता रोको   आंदोलन करण्यात आले होते. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आता आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला आहे. . 

 

परसाडे गावात अतिक्रमण क्षेत्रावर आदिवासी अनुसूचित जाती-जमातीचे लोक राहतात. त्यांच्याकडे हक्काचे घर नाही आहे. तसेच शासनाच्या इतर योजनांपासून ते वंचित आहेत. या लोकांना हक्काच्या घरकूलासह शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी यावल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोमवारी दुपारी बारा ते सव्वा दोन वाजेदरम्यान हा रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाच किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांना समजावताना पोलिसांची दमछाक झाली होती. दरम्यान तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, पोलिस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर आदींनी मध्यस्थी करून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. या मध्यस्थीनंतर सर्व आंदोलकांनी रास्ता रोको सोडून तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला आहे.

 


यांनी मध्यस्थी करत दिला पाठींबा.
या आंदोलकांसोबत शिवसेना जिल्हा उपपप्रमुख मुन्ना पाटील, सेनेचे आदिवासी विभाग प्रमुख हुसेन तडवी, रिपाईचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, युवरास सोनवणे यांनी पाठींबा दिला व तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, जितेंद्र पंजे, ग्रामसेवक मजीत तडवी आदींनी मध्यस्ती करून या जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाही करता प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन देत तोडगा काढला. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


आंदोलनात यांचा होता सहभाग   
आंदोलनात आदिवासी महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्रकुमार गवळी, राज्याध्यक्ष युनूस तडवी, परसाडे सरपंच बबीता मंहमद तडवी, उपसरपंच रूस्तम तडवी,अल्लाउद्यीय तडवी, यासिन तडवी, फिरोज तडवी, हमीद तडवी, एकनाथ भालेराव, समाधान भालेराव, परेश तायडे, रोशन तडवी, सलीम तडवी, युनूस तडवी, अारिफा तडवी, पल्लवी अडकमोल, सविता अडकमोल, साबेरा तडवी, शोभा तायडे, गुलशान तडवी यांसह महिला पुरूषांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... यावलमधील रास्ता रोकोचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...