आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Road By Digging Tribal Hills Of Alirajpur So That Children Can Go To School

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना शाळेत जाता यावे म्हणून आलिराजपूरचे आदिवासी डोंगर खोदून करताहेत रस्ता; यामुळे मुलांची सोय होईल, वेळही लागेेल कमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कपिल भटनागर|

आलिराजपूर/इंदोर - आलिराजपूर जिल्ह्यातील अंजनवाडामध्ये मुलांकडे शाळेत जाण्याचे दोनच पर्याय आहेत. पहिला म्हणजे नर्मदेवरील होडीने १५ किमी लांब सकरजा, तेथून मग २५ किमी पहाडी मार्गाने पायी मथवाड जाणे. किंवा मग अंजनवाडाहून पहाडी मार्गाने चालत सुमारे ३५ किमी लांब जाणे. दोन्ही कठीण आहेत. वेळही ६ तास लागतात. येथील आदिवासींनी या समस्येतून मार्ग काढायचे ठरवले आहे.अंजनवाडाला सरळ सकरजाला जोडता यावे म्हणून येथील लोक एकत्र येत पहाडाची छाती फोडत आहेत. मग मुलांना सहज शाळेत जाता यावे यासाठी गाडी घ्यायची. यासाठी गावातील लोकांना वेगवेगळे गट बनवले आहेत. मुलेही कामाला लागली आहेत. रस्ता तयार झाल्यानंतर मुलांची येण्या-जाण्याची सोय होईल. प्रवासातही एक ते दीड तास लागेल. अंजनवाडात वाढलेले आणि आता इंदोरमध्ये शिकत असलेले किशोर पडियार सांगतात की, येथे माझे मित्र आणि कुटुंबातील लोक रोज सकाळ होताच कुदळ, फावडा घेऊन बाहेर पडतात. सर्वांनी समिती बनवली आहे. यात वेगवेगळे दिवस आणि वेळेच्या हिशेबाने पहाड खोदण्याचे वेळापत्रक तयार केले आहे. सरकारी मदत नसल्याने पायवाटच तयार करत आहेत. ही पायवाट सकरजाच्या रस्त्याला जोडतील.इंदूरमध्ये बीएस्सी करत असलेल्या शंकरने सांगितले की, पहाडाखाली आमची शेती आहे. गुजरातमध्ये धरणे झाल्याने नर्मदेच्या पाण्यात सर्व बुडाले. आता सर्व कुटुंब मासेमारी करत उपजीविका करत आहेत. कोणी आजारी पडल्यास मोठी अडचण होते. रुग्णाला उचलून अनेक किमी चालत सकरजा, मग गाडीने आलीराजपूरला जावे लागते किंवा होडीची मदत घ्यावी लागते. आवश्यक साहित्य किंवा महत्त्वाचे काम असेल तेव्हाही हीच समस्या येते. प्रत्येकवेळी या गावातील ग्रामस्थांना द्रविडी प्राणायम करावा लागतो. आता ग्रामस्थांच्या श्रमदानातून होणाऱ्या नवीन रस्त्यामुळे ही अडचण दूर होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.गावात केवळ प्राथमिक शाळा, पुढील शिक्षणासाठी बाहेर जावे लागते

गावातीलच रोहित पडियार तलाठी आहेत, तर जामा पडियार शिक्षक, नरसिंग पडियार पंचायतीत सहाय्यक मंत्री आहेत. येथील तरुण आलीराजपूर, भोपाळ, बडवाणीमध्ये शिकताहेत. रोहित सांगतात की, आम्हालाही अडचणी यायच्या. आताही अनेकदा मुलांची सुटी करावी लागते. येथे केवळ प्राथमिक शाळा आहे. उर्वरित शिक्षणासाठी बाहेर जावे लागते.