आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली येथे रस्ता खचल्यानंतर भाजपाने केजरीवालांवर साधला निशाणा म्हणाले - केजरीवालांनी दिल्लीला 20 वर्ष मागे ढकलले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिल्ली : मंगळवारी सीवर पाइप फुटल्याने मौजपूर मेट्रो स्टेशनच्या खालील रस्ता अचानक खचला. रस्ता खचल्याने 15X30 फूटचा खड्डा बनला आहे. घटना इतक्या वेगात घटली की, रस्त्यावरून जाणारा एक ऑटो आणि कार या खड्ड्यात सामावले. या घटनेनंतर भाजपाने केजरीवालांवर निशाणा साधला आहे. दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयातून या घटनेबाबत एक ट्वीट करण्यात आले. यामध्ये लिहिले आहे की, 'हा फोटो देशाची राजधानी दिल्ली येथील आहे. आपल्या नकारात्मक राजकारणात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीच्या विकासाला 20 वर्ष मागे ढकलले आहे.' 

 

क्रेनच्या सहाय्याने काढली कार
कार आणि ऑटोला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर सिलामपूरपासून गोकळपुरी मार्गावर बराच वेळ चक्का जाम झाला होता. यामध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही. दिल्ली पाणी विभागाचे अधिकारी पाइप ठीक करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...