आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१५० मी. रस्त्यावर १३ ठिकाणी पॅचेस; खड्डे कायम; कामाला ब्रेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- अशाेक वाटिका चाैक ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या या २१५० मीटर लांबीच्या रस्त्यावर जवळपास १३ ठिकाणी पॅचेसचे काम करण्यात अाले असून, एका बाजूचेच खड्डे बुजल्याचे दिसून येत अाहे. या मार्गावर ९५ खड्डे पडले असून, त्यामुळे यापूर्वी केलेल्या ६४ लाखाचा डांबरीकरणावरील खर्च 'खड्ड्यात' गेल्याचे दिसून येत अाहे. काही दिवसांपासून या कामाला ब्रेक लागला अाहे. जेल चाैक ते वाटिका चाैकापर्यंतच्या ६० मीटर रुंदीच्या रस्त्यावर १२५ खड्डे पडले असून, खड्ड्यांमधील चुरी गायब झाल्याने धुळाचा त्रास कमी झाला असला तरी अाता कंबरेच्या त्रासाने मात्र वाहन चालक बेजार झाले अाहेत. अशीच परिस्थिती नेहरुपार्क ते सिव्हिल लाइन्स चाैक या रस्त्याचीही झाली अाहे. अशाेक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत तीन ठिकाण वगळता इतर संपूर्ण रस्त्यावर केवळ एकाच बाजूने पॅचेसचे टाकण्याचे काम झाले अाहे. 


कधी नव्हे ते महापालिका, राज्य, केंद्रात भाजपची सत्ता अाहे. त्यामुळे दाेन-तीन वर्षांपासून रस्त्यांसह इतरही मुलभूत सुविधांसाठी प्रचंड निधी सरकारकडून येत अाहे. शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची सिमेंट कॉंक्रीट व डांबरीकरणाची कामे सुरु अाहेत. मात्र काही ठिकाणची कामे निकृष्ट असल्याचे दिसून येत अाहे. असेच निकृष्ट काम अशाेक वाटिका ते रेल्वे स्टेशन या मार्गाचे झाले अाहे. या रस्त्यासह शहरातील तीन मुख्य रस्त्यांची पाहणीत हा भ्रष्ट मार्ग बनल्याचा अाराेप हाेत अाहे. 


रस्ता शाेधतांना चालक हाेतात बेजार
जेल चाैक ते अशाेक वाटिका या रस्त्यावर तर खड्यांमुळे रस्ता शाेधतच चालकांना वाहन चालवावे लागते. सध्या गाैरक्षण राेडवर सिमेंट काॅंक्रिटचे काम सुरु असल्याने संत तुकाराम चाैक, माधव नगर, सहकार नगर, किर्ती नगर, व्हीएचबी काॅलनीकडे जाणाऱ्या चालकांना जेल चाैक, िसंधी कॅम्प परिसरातूनच जावे लागते. याच मार्गावरून पुणे, नाशिककडे जाणाऱ्या बसेसची वाहतूक हाेते. त्यामुळे दुचाकी स्वारांना खड्डे चुकवता प्रचंड सावध राहावे लागते. 


मुदत संपली; लेखी अाश्वासन गेले पाण्यात
अशाेक वाटिका चाैक ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने १७ जुलै राेजी महिला व शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात हल्लाबोल अांदाेलन केले हाेते. १५ दिवसात काम पूर्ण हाेण्याचे लेखी अाश्वासन अभियंत्यांनी दिले हाेते. केवळ पॅचिंग नकाे, असेही अांदाेलकांचे म्हणणे हातेे. मात्र अाता २६ दिवसांनंतरही या रस्त्यावर खड्डे कायम अाहेत. 

 

शहरात अशाेक वाटिका ते मुख्य टपाल कार्यालया दरम्यान २२७ मीटर लांबीचे पॅच 
१. अशाेक वाटिका ते मुख्य डाक घरानजीकपर्यंत दाेन पॅचींगचे काम करण्यात अाले अाहे. पहिला पॅज हा जवळपास १४२ लांब मीटर असून, रुंदी ३ मीटर अाहे. दुसरा पॅच अाहे. ८१ मीटर लांब अाहे. 
२. उपरोक्त दाेन्ही ठिकाणच्या पॅचींगच्या बाजूने खड्यांची श्रृंखुलाच असून, चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. एकाच बाजूने काम करुन तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात अाला अाहे. '


या ठिकाणी करण्यात आलेे पॅचिंगचे काम 
१. अशाेक वाटिका ते रेल्वे स्टेशन यादरम्यान जवळपास १३ ठिकाणी पॅचिंगचे काम करण्यात अाले अाहे. यात गांधी जवाहर बाग ते टाॅवर चाैक( बाजी बाजारच्या समाेरील भागासह), टाॅवर चाैक ते शास्त्री स्टेडियमच्या मुख्यद्वारापर्यंत, भारिप-बमसंचे कार्यालय ते एसीसी क्लब मैदान, शुक्ल हाॅस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते अग्रसेन चाैकापर्यंत, न्यायालयाचे मुख्य द्वार ते सा.बा. बांधकाम विभागापर्यंत पॅचिंगचे काम करण्यात अाले. 

२. रेल्वे स्टेशनकडून अशाेक वाटिकेकडे जाणाऱ्या मार्गावर ९५ खड्डे पडले अाहे. या मार्गावर अनेक ठिकाणी एकाच बाजूने पॅचिंगचे काम करण्यात अाले अाहे. या मार्गावर श्रीराम िवजय हाॅटेल ते वनविभागाचे कार्यालय, माऊंट कारमेल ते अायडीबीअाय बॅक, ढगेकर काॅम्पलेक्स ते नमिता सेल्स, टाॅवर चाैक (मुत्री घर) ते शासकीय िवश्राम गृहापर्यंत पॅचिंगचे काम करण्यात अाले अाहे. एकाच बाजूने पॅचिंगचे काम करण्यात अाले असून, दुसऱ्या बाजूचे खड्डे कायम अाहेत. 


रस्त्याचे काम पूर्ण हाेणार 
अशाेक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु अाहे. सध्या पावसाळा सुरु अाहे. रस्त्याच्या कामासाठी डांबर तयार व्हायला काही अवधी लागताे. त्यामुळे लवकरच काम पुन्हा सुरु हाेणार अाहे. संपूर्ण मार्गाचे काम हाेणार अाहे.
- मिथिलेश चाैहान, कार्यकारी अभियंता. 

बातम्या आणखी आहेत...