आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारासाठी झाडांचा बळी! मुख्यमंत्र्यांच्या महा जनादेश यात्रेसाठी बारामतीत ढेरेदार झाडांवर कुऱ्हाड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - भाजपची महाजनादेश यात्रा शनिवारी बारामतीत पोहोचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष रथास येथील झाडांचा अडथळा होईल असे प्रशासनाला वाटले... आणि गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यांच्या दुतर्फा असलेली ही सावलीदार झाडे कापण्याचा निर्णय घेण्यात आला. रथामध्ये बसून मुख्यमंत्री झाकले जाऊ नये यासाठी प्रशासनाने चक्क झाडांवरच कुऱ्हाड लावली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महा जनादेश दौऱ्यात त्यांचे रथ सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. याच रथामध्ये बसून मुख्यमंत्री आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना हात दाखवून अभिवादन करत असतात. या रथामध्ये त्यासाठी विशेष अशी लिफ्ट देखील बसवण्यात आली आहे. परंतु, जर त्यातून मुख्यमंत्रीच दिसले नाही, तर मग इतक्या आकर्षक रथाचा काय उपयोग? एकीकडे शासन आणि प्रशासनाकडून वृक्षसंवर्धनाचे सल्ले दिले जातात. झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देखील दिल्या जातात. परंतु, मुख्यमंत्र्यांचा हा रथ झाकला जाऊन नये म्हणून या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा आदेश सरकारने काढला आहे. अर्थातच प्रचाराच्या रणधुमाळीत या ढेरेदार झाडांचा बळी घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...