आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची कामे कालमर्यादेत, गुणवत्तेने न झाल्यास कंत्राटदारांवर कारवाई - सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : खडकवासला येथील सिंहगड रस्ता, नांदेडपासून पानशेत आणि वेल्हापर्यंतच्या विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. किरकिटवाडी व खडकवासला येथील गावातील रस्त्याची लांबी ११८.७० किमीची असून हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत काम सुरू आहे. या रस्त्याचे काम ३० टक्के पुर्ण झाले असून, सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल. ही कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण कामे न केल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत 
मंगळवारी दिली.

खडकवासला येथील रस्त्यांच्या कामासंदर्भात सदस्य माधुरी मिसाळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक वाहिन्या स्थलांतरीत करून काम करावे लागत असल्याने, गतीने काम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. वाहतुक सुरक्षेची उपाययोजना करून व वाहतुक नियंत्रित करणे पण आवश्यक असून, कामे गुणवत्ता राखून पुर्ण जलद गतीने करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री भरणे यांनी दिली.

खडकवासला रस्ता सप्टेंबरपर्यंत पूर्ण

अशोक चव्हाण म्हणाले, किरकिटवाडी व खडकवासला या एकूण रस्त्याची लांबी ७६.१६ किमी पैकी २४.२२ किमी लांबीचे काम पूर्ण असून ११.४६ किमी लांबीत काम प्रगतीत आहे. गावांतील लांबी ही ११.७० किमी असून त्यापैकी ३.६५ किमी लांबीतील काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संग्राम थोपटे, भीमराव तापकिर यांनी सहभाग घेतला. 

बातम्या आणखी आहेत...