आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीपूर्वी १०० कोटींतून पाच प्रमुख रस्त्यांसह नाल्यांचे मजबुतीकरण हाेणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 जळगाव - नगरोत्थान अभियानांतर्गत महापालिकेला १०० कोटींचा निधी मंजूर अाहे. त्यातून शहरातील प्रमुख पाच रस्त्यांच्या कामांचा डीपीअार तयार करण्यात येत अाहे. लोकसभा निवडणुकीच्या घाेषणेपूर्वीच या कामांना प्रारंभ हाेईल. यातून शिल्लक निधीतून शहरातील नाल्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याचे अामदार सुरेश भाेळेंनी सांगितले. 

अाॅगस्ट महिन्याच्या अखेरीस राज्य शासनाने जळगाव महापालिका क्षेत्रातील मूलभूत विकास कामांसाठी नगरोत्थान अभियानांतर्गत १०० काेटींचा निधी मंजूर केला हाेता. या याेजनेंतर्गत पालिकेला ३० टक्के निधी खर्च करायचा हाेता; परंतु पालिकेची अार्थिक स्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या हिश्श्याची रक्कम विशेष बाब म्हणून मॅचिंग ग्रंॅड शासन अदा करेल, अशी घाेषणा करत माेठा दिलासा दिला हाेता. 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सुचविल्याप्रमाणे शहरात भुयारी गटारींचे काम प्रस्तावित असल्याने काँक्रीटचे रस्ते करणे अशक्य असल्याचा मुद्दा नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसाेबतच्या बैठकीत उपस्थित करण्यात अाला हाेता. दाेन वर्षांनंतर पुन्हा रस्त्यांचे खोदकाम करावेच लागणार असल्याने काँक्रीटएेवजी डांबरी रस्त्यांचा पर्याय योग्य ठरेल असेही सांगितले हाेते. त्यानुसार शहरातील पाचही प्रमुख रस्त्यांची कामे डांबरीकरणाने हाेणार असल्याचे अामदार भोळेंनी सांगितले. 


निवडणुकीपूर्वी कामांचा श्रीगणेशा : मंत्रालयातील बैठकीनंतर अाता १०० काेटींतून पाच प्रमुख रस्त्यांसाठी सुमारे ९० ते ९२ काेटी रुपये खर्च येणार अाहे. या निधीतून हाेणाऱ्या कामांसाठी डीपीअारचे काम सुरू झाले अाहे. कामांना मंजुरी, निविदा प्रक्रिया अादीसाठी दाेन महिने लागण्याची शक्यता अाहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी कामांचा श्रीगणेशा केला जाईल, असेही अामदार भोळेंनी स्पष्ट केले. 

 

उर्वरित निधीचे नियोजन करणार :

१०० काेटींच्या निधीतून ७ ते १० काेटी रुपये शिल्लक राहणार अाहेत. या निधीतून शहरातील लहान व माेठ्या नाल्यांचे मजबुतीकरण करण्याचे नियोजन अाहे. शहरातील बहुसंख्य नाल्यांच्या संरक्षण भिंती कोसळल्या अाहेत. त्यामुळे शहरातील काही भागातील नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी खर्च केला जाणार अाहे. 
काॅलन्यांना जाेडणाऱ्या रस्त्यांची कामे : शहरातील डीपी रस्त्यांच्या डांबरीकरणासाेबतच शहरातील प्रचंड वर्दळ असलेल्या व काॅलन्यांना जाेडल्या जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांचेही या निधीतून कामे करण्यात येतील. 


पाच काेटीतील कामांना लवकरच सुरुवात : राज्य शासनाने शहरातील मूलभूत विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला अाहे. या निधीतील कामांना स्थायी समितीत मंजुरी मिळाली अाहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठवला अाहे. या कामांना लवकरच सुरुवात हाेईल, असा दावा केला. 

 
कामांसाठी वाळूपुरवठ्याची जबाबदारी ठेकेदाराची 
२५ कोटींतून करण्यात येणाऱ्या जवळजवळ सर्वच कामांचे भूमिपूजन करण्यात अाले अाहे; परंतु काही ठिकाणी वाळू उपलब्ध हाेत नसल्याने ठेकेदाराने काम अर्ध्यात बंद केल्याच्या तक्रारी प्राप्त हाेत अाहेत; परंतु दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदाराची अाहे. त्यासाठी संपूर्ण नियोजन ठेकेदारानेच करायचे अाहे असे अामदार भाेळे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...