आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅकग्राउंड डांसर्ससोबत खूप वाईट असते प्रियंका चोप्राची वागणुक, रिअॅलिटी शोमध्ये एका कंटेस्टंटने सांगितली व्यथा, म्हणाला- मला तिला मारायचे आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिअॅलिटी शो 'रोडीज रिअल हीरोज'चा एक व्हिडिओ सोशल मीडियाव व्हायरल होत आहे, ज्यात एक कंटेस्टंट बॉलीवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोप्राबद्दल एक चकित करणारा दावा करत आहे. खरतर, कंटेस्टंट म्हणाला- मला तिला मारायचे आहे. हे ऐकून उपस्थित सगळे लोक हैराण झाले. जजच्या खुर्चीवर बसलेल्या नेहा धुपियाने त्याला याचे कारण विचारले. त्यानंतर कंटेस्टंटने ऐकवली हैराण करणारी किस्सा...

 

- नेहाच्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, त्याने प्रियंकासोबत बॅकग्राउंड डांसर म्हणून काम केले आह आणि एके दिवशी प्रियंकामुळे त्याला आणि इतर डांसर्सना दिवसभर उपाशी राहावे लागले होते. त्याने सांगितले की, एका शोसाठी तो प्रिंयकासोबत प्रॅक्टीस करत होता, पण शोच्या एक दिवसा आधी प्रियंकाने डांस स्टेप्स बदलायला लावले, ज्यामुळे अनेक तास त्यांना प्रॅक्टीस करावी लागली. त्यामुळे जेवण करता आले नाही, आणि त्यामुळेच ते सगळे खूप थकले होते. त्याने हेही सांगितले की, प्रियंकाने असे एक वेळेस नाही तर अनेकवेळा असे केले आहे.


बॅकग्राउंड डांसर्सला तुच्छ समजते प्रियंका: कंटेस्टंट
- त्याने पुढे सांगितले की, प्रिंयकाला खूप घंमड आहे. प्रियंका जेव्हा डांसर्सच्या रूममध्ये जायची तेव्हा एका बाजुला थांबायची, ती हे सांगण्याचा प्रयत्न करायची की, माझ्यासमोर डांसर काहीच नाहीये.

बातम्या आणखी आहेत...