आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोडरोमिओंकडून मुलीला अश्लील इशारे; तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/घनसावंगी  - घनसावंगी शहरात शिक्षण घेण्यासाठी बसने प्रवास करत असलेल्या मुलींना रोजच टवाळखोर मुलांचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सोमवारी बसमध्ये बसलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करत अश्लील इशारे करणाऱ्या तीन जणांविरुद्ध मुलींनीच घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रवीण धनंजय मोरे, गजानन लहू मोरे, दीपक मधुकर धानुरे अशी रोडरोमिओंची नावे आहेत. 


अंबड ते कुंभार पिंपळगाव या एसटी बसने नेहमीप्रमाणे मोहपुरी येथील एक अल्पवयीन मुलगी संत रामदास महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असताना घनसावंगी बस स्थानकावर एसटी बसने येतात. बोधलापुरीवरून या गाडीत बसलेल्या प्रवीण धनंजय मोरे, गजानन लहू मोरे, दीपक मधुकर धानुरे या तीन जणांनी विद्यार्थिनीला अश्लील इशारे करून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. 


कायद्याने शिक्षा मिळणार 

याविषयी घनसावंगी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शालेय मुलीची छेड काढणाऱ्या व त्यांना त्रास देणाऱ्या रोमिओंना माफी मिळणार नसून त्यांना कायद्याने शिक्षा 
मिळणार आहे. आम्ही विशेष मोहीम राबवून या रोडरोमिओंचा बंदोबस्त करणार असल्याची माहिती दिली. या परिसरात जाऊन कारवाई करू, असे दामिनी पथकाच्या पल्लवी जाधव यांनी सांगितले. या वेळी महिलांसह मुलींनी स्वत: ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 

दामिनी पथक जालन्यात; रोडरोमिओ खेड्यांत  
पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दामिनी पथक कार्यरत झालेले आहेत. नुकताच हा चार्ज पल्लवी जाधव यांच्याकडे आला आहे. दामिनी पथकाच्या कारवाया केवळ जालना शहरापुरत्याच मर्यादित आहेत.  या दामिनी पथकाकडून तालुके, बाजारपेठेची गावे, महाविद्यालयांमध्ये जनजागृती होत नसल्यामुळे ग्रामीण भागात मात्र रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी त्रस्त आहेत. ग्रामीण भागात बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना विशेष करून या प्रकाराचा सामना करावा लागत आहे.