Home | Magazine | Madhurima | Roaring twenties and cicago article of Shiv Kdam

रोअरिंग ट्वेन्टीज आणि शिकागो

शिव कदम | Update - Apr 16, 2019, 12:20 PM IST

आर्थिक, सांस्कृतिक भरभराटीचं चित्रं रंगवलं जात होतं.

  • Roaring twenties and cicago article of Shiv Kdam

    कॉन्ट्रॅक्ट किलर पासून, पॉर्नस्टारपर्यंत सगळ्यांमधील ‘माणुसकी' चा आपण ऊहापोह करतो. या सगळ्यात गुन्हेगाराचं, त्याच्या गुन्हेगारीचं उदात्तीकरण तर होत नाहीए नं असा प्रश्न विचारणारी मॉरीन आज भारतात निर्माण व्हायला हवी.

    रॉब मार्शलची म्युझिकल फिल्म शिकागो २००२ मध्ये रिलीज झाली. बॉक्स ऑफिस ते ऑस्कर सगळीकडे त्याने धूम केली. हा सिनेमा बघून दिग्दर्शक एकच वाक्य बोलू शकतो,‘धिस इज इम्पॉसिबल’. कुतूहलापोटी मी सिनेमाचं मूळ शोधू लागलो. अप्रतिम स्क्रीनप्ले, स्पेलबाउंड मेकिंग, म्युझिकल फॉर्म, सटायरचा अँगल असूनही एवढं वास्तववादी चरित्रचित्रण? कसं शक्य आहे? या प्रश्नांचं उत्तर एकच... मॉरीन डल्लास वॉटकिन्स


    १९२० चे दशक अमेरिका आणि पश्चिम युरोपसाठी रोअरिंग ट्वेन्टी होते. आर्थिक, सांस्कृतिक भरभराटीचं चित्रं रंगवलं जात होतं. पण या वेगवान घडामोडींमध्ये अनेक गोष्टींचा विपर्यास होत होता. अतिशयोक्ती होत होती. समाज कुठलाही असो, तो सतत कशा न कशाच्या तरी नशेत असतो. किंबहुना प्रत्येक दशकात तो नशेची कारणं शोधत असतो. ही नशा तोडण्याचं काम कलावंत करतो. मॉरीन १९२० मध्ये पत्रकारितेत होती. एक गोष्टी अनेक दृष्टिकोनातून पाहण्यात तिचा हातखंडा. यादरम्यानं शिकागोत एक घटना घडली. दोन जॅझ सिंगर्सना खुनाच्या आरोपातून मुक्त केलं गेलं. मॉरीन या घटनेला वेगवेगळ्या अँगल्सने बघू लागली. गुन्हा कबूल केलेला असतानाही त्या काळातील समाज, मीडियाचा प्रभाव (खरं तर दबावच), कायद्याचे फायद्यानुसार केलेले इंटरप्रिटेशन यामुळे कोर्टाने दिलेला स्त्रीवादी निर्णयहीा मॉरीनला खटकतो. ती बारकावे शोधते. वर्तमानपत्रात लेख लिहिण्याऐवजी जन्म देते एका अजरामर कलाकृतीला, हेच ते १९२६ मधलं ‘शिकागो द म्युझिकल’. ‘शिकागो...’ वर दोन फिल्म्स बनल्या, एक १९२७ मध्ये आणि एक २००२ मध्ये. २००२ मध्ये बनलेली शिकागो माध्यमांतराचा उत्तम नमुना आहे.


    या नाटकाची खासियत होती मॉरीनने रंगवलेली पात्रं. स्त्रीवादावर, स्त्रियांच्या समस्येवरच्या कथेत, पटकथेत, नाटकात सहसा पीडितेला निरागस, निष्पाप रंगवले जाते. पण मॉरीनचा अँगल तिला वेगळे चित्र दाखवतो. कोर्ट, समाज, मीडियाने स्वीकारलेल्या निर्णयाला उपहासात्मक पद्धतीने ती आव्हान देते. ही कलाकृती पाहताना समाज अंतर्मुख होतो. शंभर वर्षांपूर्वी युरोप, अमेरिकेत घडलेल्या घटना आज आपल्याकडे घडत आहेत. ‘क्रिमिनल सेलिब्रिटी’ ही संकल्पना आपल्याकडे रूढ होतेय. कॉन्ट्रॅक्ट किलरपासून पॉर्नस्टारपर्यंत सगळ्यांमधील ‘माणुसकी’चा आपण ऊहापोह करतो. या सगळ्यात गुन्हेगारांचं, त्यांच्या गुन्ह्यांचं आपण सेलिब्रेशन तर करत नाही नं असा प्रश्न विचारणारी मॉरीन आज भारतात निर्माण होणे गरजेचे आहे. स्वतःचे सुख नवऱ्याच्या परस्पर शोधणारी रॉक्सी आपल्या प्रियकराची हत्या करते. प्रियकर आपला वापर करतोय. आपल्यातला इंटरेस्ट संपल्यामुळं तो झिडकारतोय या अविचारानं प्रियकराची हत्या करते. घरात आलेला प्रियकर एक भुरटा चोर होता असं ती नवऱ्याला सांगते. नवऱ्याला ते खरं वाटतं. पण पोलिस सत्य शोधतात. रॉक्सीला तुरुंगात जावे लागते. धूर्त रॉक्सीला कधीच न हरलेला वकील भेटतो. नानाप्रकार करून रॉक्सी निर्दोष सुटते, असे शिकागोचे कथानक. मॉरीनने चितारलेली पात्रं शिकागोला वैशिष्ट्यपूर्ण ठरवतात. शंभर वर्षांपूर्वीची मॉरीनने रंगवलेली पात्रं आजही आपल्या आसपास दिसतात. आजही सगळीकडे तेच चालू आहे. हे सगळे असेच चालत राहील, तोपर्यंत, जोपर्यंत ‘आजची’ मॉरीन आपल्या अँगलने या सगळ्याकडे बघणार नाही, त्यावर भाष्य करणार नाही.

Trending