आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला लुटले; दीड लाख रुपये केले लंपास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : जालना शहरातील नवीन मोंढा रोडवरील बगडिया यांच्या नवीन प्लॉटिंगजवळ दुचाकीवरून घरी जाणारे व्यापारी पंकज बाबुलाल अग्रवाल (४०, गोपीकिशनगनर जालना) यांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी अडवले. त्यानंतर फायटरने मारहाण करून, खिशातील १ लाख ४३ हजार ३५० रुपये लुटून नेले. ही घटना १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरली आहे. या हल्ल्यात पंकज अग्रवाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर वरकड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जालना शहरातील गोपीकिशननगर येथील रहिवासी पंकज अग्रवाल यांचे जालना नवीन मोंढ्यात ट्रेडिंग कंपनीचे दुकान आहे. १ ऑक्टोबर रोजी पंकज अग्रवाल दिवसभर नवीन मोंढ्यातील दुकानात होते. व रात्री नवरात्रीनिमित्त दुकानाची साफसफाई कामावरील कर्मचाऱ्यांकडून करून घेतली. रात्री ८ वाजता दुकानातून पंकज अग्रवाल दुचाकीवर घरी निघाले. नवीन मोंढ्याजवळील बगडिया यांच्या नवीन प्लॉटिंग समोरून जात असतांना, पाठीमागून फिल्मी स्टाइलने दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यातील एका चोरट्याने फायटरने डोक्यात बुक्क्या मारून गंभीर जखमी केले. या वेळी चोरट्यांनी पंकज अग्रवाल यांच्या खिशातील १ लाख ४७ हजार ३५० रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर अग्रवाल यांनी स्वतःच्या बचावासाठी दुचाकी सोडून चोर-चोर असे ओरडत नवीन मोंढ्याकडे पळ काढला. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी या वेळी वाहने थांबवली असता, तिन्ही चोरटे दुचाकीवर पळून गेले.

बातम्या आणखी आहेत...