आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसी डब्यात तिकीट आरक्षित करून चोरी करणारा अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेच्या एसी डब्यातील महिला प्रवाशांच्या पर्स चाेरणाऱ्या अाराेपीस पुणे पाेलिसांनी अटक केली अाहे. तो रेल्वेच्या एसी डब्याचे तिकिट आरक्षित करून प्रवास करायचा आणि मध्येच चोरी करून उतरायचा. आरोपीकडून सुमारे ९ लाख रुपये किमतीचे हिरे-साेन्याचे दागिने व राेख मुद्देमाल जप्त केला आहे. 


अल्ला बक्श महंमद इस्मार्इल (१९, रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. ७ जुलै राेजी सिद्धार्थ भंडारी यांच्या पत्नीची पर्स अजमेर-म्हैसूर रेल्वेत चोरी झाली. त्यात १४ हजार रुपये होते. २ सप्टेंबरला रेखा भंडारी (इचलकरंजी) जाेधपूर-बंगळुरू एक्स्प्रेसने जात असताना त्यांचीही पर्स चोरीला गेली. त्यातील ७ लाख ५८ हजार रुपयांचा माल होता. दरम्यान, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये इस्माईलचा शोध लागला.इस्माईलने गुलबर्गा रेल्वेस्टेशनवर वाॅटर प्युरिफिकेशनचे काम केलेले असल्याने त्याला रेल्वेबाबत बरीचशी माहिती हाेती. एसी डब्यातील तिकीट अारक्षित करायचा व रात्रीच्या वेळी महिला झाेपल्यानंतर त्यांच्याजवळील पर्स स्वत:जवळील पाठीवरील सॅकमध्ये टाकून पळून जायचा. महिन्यातून अाठ वेळा त्याने गुलबर्गा ते मुंबई तिकिटाचे अारक्षण केल्याचे दिसून अाले अाहे 

बातम्या आणखी आहेत...