आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीतील टोळीला शस्त्रांसह अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली चार सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केली. नगर- पुणे रोडवरील जातेगाव घाट येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून धारदार सुरा, एक कटावणी, दोरी व दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.


पिंपळगाव कवडा येथील रमेश भोसले हा त्याच्या साथीदारांसह दोन दुचाकीवरून नगर- पुणे रोडने वाडेगव्हाण गावाच्या दिशेने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चालला असल्याची गोपनीय माहिती पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भाेसले, विक्रम रोहिदास भोसले (तिघे रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) व अक्षय जास भाेसले  (रा. बुऱ्हाणनगर, ता. नगर) यांना अटक केली. आरोपी हरिष काळे हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...