आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOST WANTED नवरदेव, दिसताच करा पोलिसांना फोन, आतापर्यंत 5 जणींना घातला गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - नोएडाच्या एका लुटेऱ्या नवरदेवाविरुद्ध वाराणसीमध्ये एका विवाहितेचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुण शर्मा असे या भामट्या नवरदेवाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणाची कथित बहीण आणि गर्लफ्रेंड दुर्गांशू शर्मालाही आरोपी बनवण्यात आले आहे. याप्रकारे भामट्या नवरदेवाविरुद्ध आतापर्यंत 5 गुन्हे दाखल झालेले आहेत. नोएडा आणि इंदुरात येथेही महिलांशी लग्न करून लाखो रुपये हडप केल्याचे गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे, मेरठ आणि चंदिगडमध्ये फसवणूक करून लाखोंचा गंडा घातल्याची तक्रार दाखल आहे. 5 शहरांमध्ये फसवणूक केल्यानंतरही पोलिसांना अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.

 

नोएडामध्ये बिंग फुटले, तर भोपाळमध्ये केले दुसरे लग्न
तरुणला भोपाळमध्ये राहतानाच 24 मे 2018 रोजी नोएडाच्या वृत्तपत्रांमध्ये आपल्याविरुद्ध बातमी प्रकाशित झाल्याची माहिती मिळाली होती. दुसऱ्या दिवशी कळले की, नोएडामध्ये लग्न करून महिलेला गंडा घातल्यानंतर जानेवारी 2018 मध्ये भोपाळच्या महिला बँक मॅनेजरशी लग्न केले होते. तिचेही लाखो रुपये तरुणने हडपले होते. मीडियामध्ये प्रकरण आल्यानंतर तो 24 मेच्या संध्याकाळी गुपचूप दुर्गांशुसोबत कार घेऊन फरार झाला होता.

 

भोपाळमधून पळून वाराणसीच्या हॉटेलमध्ये थांबला
तरुण भोपाळमधून पळून वाराणसीला पोहोचला होता. तेथे तो कल्याणी पाठकच्या संपर्कात आला. कल्याणी यापूर्वी तरुण शर्माच्या एका चॅनलमध्ये कार्यरत होती. चौकशीत आढळले की, कल्याणीनेच तरुणला वाराणसीमधून 2 बनावट सिमकार्ड घेऊन दिले होते. यानंतर 30 जून रोजी कल्याणीलाही सोबत घेऊन तरुण आणि दुर्गांशु फरार झाले. याप्रकरणी अनेक दिवस तपास केल्यानंतर कल्याणीच्या कुटुंबीयांनी वाराणसीच्या दशाश्वमेध पोलिसांत तरुण आणि दुर्गांशुविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.

 

असा वाचत राहिला... गँगस्टर अॅक्टमध्ये कारवाईचे निर्देश, 2 महिन्यांपासून जंग-जंग पछाडत आहेत पोलिस
एसएसपी डॉ. अजय पाल यांनी सेक्टर-24 पोलिसांना मे महिन्यात आरोपींना अटक करून आणि जुन्या प्रकरणांत गँगस्टर अॅक्टमध्ये कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु दोन महिन्यांनंतरही पोलिसांना अजूनपर्यंत काहीही सुगावा लागलेला नाही.

- पोलिसांचे मानणे आहे की, आरोपीचे शेवटचे लोकेशन केरळमध्ये आढळले होते. त्यानंतर आरोपीची काहीही मिळालेली नाही. यावर एसएसपींनी पोलिसांची खरडपट्टी काढत 15 दिवसांत अहवाल मागितला आहे.
- तथापि, नोएडामध्ये राहताना तरुणने मेट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून महिला नर्सशी लग्न केले होते. काही महिने सोबत राहिल्यानंतर महिलेकडून लाखो रुपये हडपून तो दुर्गांशुसोबत फरार झाला होता.
- नोएडा पोलिसांनी सप्टेंबर 2017 मध्येच एफआयआर दाखल केली होती. मे 2018 मध्ये कळले होते की, तरुण याने याचप्रकारे मेट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून तरुणींना फसवलेले आहे. तो विनाहुंड्याचे लग्न करण्याचे सांगून नंतर लाखो रुपये घेऊन पळून जातो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भामट्या नवरदेवाचे आणखी Photos..  

 

बातम्या आणखी आहेत...