आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायादेवीनगर परिसरात सरकारी अधिकाऱ्यांची २ बंद घरे फोडली ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मायादेवीनगरात चोरट्यांनी दोन सरकारी अधिकाऱ्यांची बंद घरे फोडली. घरमालक अधिकारी बाहेरगावी असल्यामुळे किती ऐवज चोरीस गेला हे स्पष्ट झालेले नाही. ही घटना रविवारी रात्री घडली. तर सोमवारी उघडकीस आली. 


मायादेवीनगरातील दिलीप रामदास झोपे व एस.व्ही.चौधरी यांच्या घरी ही घटना घडली आहे. झोपे हे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस आहेत. तर चौधरी हे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहेत. झोपे कुटुंबीय १० जानेवारीपासून हैद्राबाद येथे गेले आहेत. त्यांच्या दुमजली बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मागच्या बाजूला भाडेकरू राहतात. चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी बाहेरुन बंद केली होती. झोपे यांच्या वरच्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्येही चोरट्यांनी प्रवेश करून दोन कपाटे फोडली आहेत. झोपे यांचे नातेवाईक जगदीश बोरोले यांनी फोनवरून त्यांना माहिती दिली. झोपे कुटंुबीय हैद्राबाद येथून आल्यानंतर चोरीच्या ऐवजाची माहिती समोर येईल. तसेच चौधरी दाम्पत्य हे नाशिक येथे राहणाऱ्या मुलाकडे वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. त्यांचेही घर आहे. सोमवारी सकाळी घरकाम करणारी मोलकरीण झाडांना पाणी देण्यासाठी आली तेंव्हा मागचा दरवाजा उघडा दिसला. मोलकरणीने आरडा-ओरड केल्यानंतर नागरिक आले. चौधरी यांच्या घरातील साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त केल्याचे दिसलेे. दरम्यान, त्यांच्या घरातून पाच हजार रुपये रोख व काही सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी चौधरी आल्यानंतर पुढील माहिती स्पष्ट होणार आहे. 


१०० मीटरच्या अंतरावर दोन्ही घरे 
चौधरी व झोपे यांची घरे मायादेवीनगरात आहेत. दोन्ही घरांमध्ये सुमारे १०० मीटरचे अंतर आहे. चोरट्यांनी एकाच रात्री दोन्ही घरांमध्ये चोरी केल्यामुळे या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी मध्यरात्री श्यामनगरात घरफोडी करून चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज लुटला. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मायादेवीनगरात दोन घरे फोडल्याने नागरिक भयभीत आहेत. 


पोलिस पथकाने केली पाहणी 
रामानंदनगर पोलिसांनी मायादेवीनगरात घटनास्थळाची पाहणी केली आहे. शेजारच्या लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच झोपे व चौधरी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. चोरी झालेल्या या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत काय? याचा तपास पोलिसांनी सोमवारी केला. 
 

बातम्या आणखी आहेत...