आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्ह्यातील अट्टल दरोडेखोर पपड्या काळेस केली मेहकरात अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर- गत महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरोडा टाकून सुमारे २६ लाखांचा ऐवज लंपास करणारा तसेच गोळीबार करून एका सराफाला ठार करणारा पपड्या काळे याला मेहकर पोलिसांनी स्थानिक बसस्थानक परिसरात अटक केली. 


अहमदनगर जिल्ह्यातील काेळेपेवाडी येथील मार्केटमध्ये १६ ते १७ दरोडेखोरांनी हातबॉम्ब फेकून लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश धाडगे व शाम धाडगे यांचेवर गोळीबार केला. यात शाम धाडगे यांची हत्या केली. तसेच दुकानातील सोने व चांदीचे दागिने, रोख २६ लाख रुपये चोरुन नेले होते. या गुन्ह्यातील फरार मुख्य सुत्रधार आरोपी पपड्या उर्फ संजय उर्फ राहुल व्यंकटी उर्फ माहदु उर्फ महादेव उर्फ गणपती काळे रा. वर्धा हा २५ सप्टेंबर रोजी मेहकर शहरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांचे रायटर पोकॉ. गणेश लोढे यांना मिळाली. यावेळी एक विशेष पथक तयार करुन या पथकाने मेहकर शहरात पेट्रोलिंग ठेवली असता बसस्थानक परिसरात एका साधूच्या वेशात भगवे कपडे घालून एक संशयित व्यक्ती दिसून आला. 

 

यावेळी पोलिसांनी त्यास व त्याचे सोबत असलेल्या त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले आणि अधिक चौकशी केली असता तो अट्टल गुन्हेगार पपड्या गँगचा सुत्रधार असल्याचे समोर आले. या प्रकरणातील इतर आरोपींना अहमदनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही कार्यवाही पोनि प्रधान, पोहेकॉ संजय पवार, देविचंद चव्हाण, नापोकॉ गजानन सानप, रोहीदास जाधव, पंढरी गिते, उमेश घुगे, अतुल पवार, श्रीराम निळे, पोकॉ. गणेश लोढे, संजय जाधव, अशोक घोंगे, देवेंद्र इंगळे, गजानन पांढरे यांनी केली. पपड्या काळेच्या टोळीने यापूर्वी आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी धाडसी दरोडे टाकले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...