आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू घेऊन आला होता तरुणीला लुटण्यासाठी, कॅश हिसकावला! दुसऱ्याच क्षणी बँक बॅलेन्स पाहून परत केले पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - विचित्र चोरीची एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. अनेक जण या विचित्र चोरट्याचे कौतुक करत आहेत. घडले असे, की चीनमध्ये एक तरुणी एटीएमवरून पैसे काढत होती. त्याचवेळी अचानक एक चोरटा तिच्या मागेच एटीएम कॅबिनमध्ये घुसला. त्याने चाकूचा धाक दाखवून त्या तरुणीला सगळेच पैसे देण्यास सांगितले. काही सेकंदांपूर्वीच तिने एटीएममधून 2500 युआन काढले होते. तिने ते सगळेच पैसे त्या चोरट्याच्या हवाली केले. यानंतरही चोरट्याचा लोभ शांत झाला नाही. त्याने आणखी पैशांची मागणी केली. महिलेने नकार दिला तेव्हा तिला पुन्हा चाकू दाखवून बॅलेन्स चेक करण्यास सांगितले. यानंतर त्या चोरट्याने घेतलेले पैसे सुद्धा तिला परत दिले.


बँक अकाउंटमध्ये होते रिकामे...
चिनी माध्यम शांघाइस्टच्या वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरट्याने आधी महिलेला धमकावून तिच्या हातातील पैसे घेतले. यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली. परंतु, अकाउंट बॅलेन्स चेक केले तेव्हा तिच्या खात्यात शून्य असल्याचे चोरट्याला दिसून आले. जेवढे पैसे होते, तेवढे तिने काही सेकंदांपूर्वीच खात्यातून काढले आणि चोरट्याला दिले होते. यानंतर चोरालाही तिच्यावर दया आली आणि त्याने घेतलेले पैसे तिला परत केले. एटीएमवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो चोरटा पैसे देताना आणि स्माइल करताना दिसून येतो. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. लोक एकमेकांना त्या ठिकाणी ठेवून आपले मनोगत शेअर करत आहेत. त्यापैकी एकाने लिहिले, त्या चोरट्याने माझे बँक खाते चेक केले असते तर दारिद्र्य पाहून खिशातूनही पैसे दिले असते.

बातम्या आणखी आहेत...