आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकला दरोडेखोरांच्या टोळीने केला पोलिस पथकावर गोळीबार; तिघांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक  - आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीने पाठलाग करणाऱ्या  पोलिस पथकावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार महामार्गावरील गुंजाळ बाबा नगर परिसरात घडला. पथकाने केलेल्या गोळीबारात एक फरार दरोडेखोर जखमी झाला. अंधाराचा फायदा घेत दोघे दुचाकी चोरी करून मनमाडला फरार झाले. मात्र, पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी पहाटे  २ वाजता आडगाव परिसरातील कोणार्क नगरमधून हा सिने स्टाईल थरार सुरू होता.  राजेंद्र गोलासिंग टाक,  सुनिल जितसिंग आणि, हरदिपसिंग बबलू सिंग टाक (रा. जालना) या तिघांना अटक केली,तर अमनसिंग टाक,  आणि लखन (पूर्ण नाव नाही) हे दोघे फरार झाले.  संशयितांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 


पहाटे आडगाव शिवारात आर.जे ज्वेलर्स या सराफ दुकानाचे लोखंडी ग्रील तोडताना एकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने पोलिसांना माहिती दिली. वाहनाचा सायरन अवाज आल्याने संशयितांनी कारमधून पळ काढला. या वेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर गोळीबार केला. यात एक दरोडेखोर जखमी झाला. 


राजेश गोल सिंग टाक याची सासूरवाडी भीमवाडी गंजमाळ येथे आहे. रात्री आठ वाजता द्वारका येथे सर्व संशयित एकत्र आले. येथे त्यांनी दरोड्याचा कट रचला. दोघांनी इंदिरानगर परिसरातून इंडिका गाडी चोरी केली. रात्री पाच संशयित सायखेडा येथे परिसरातील कमल ज्वेलर्स दुकान फोडून टोळी वृंदावन नगर येथे आले. आर.जे. ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्नात असताना त्यांचा कट फसला. अंधाराचा फायदा घेत चौघे फरार झाले. सुनिल सिंग जितसिंग, हरदिपसिंग बबलू सिंग टाक या दोघांनी दुचाकी चोरी करत मनमाडला पलायन केले. एकाला पथकाने तर दोघांना मनमाड रेल्वे स्थानकावर अटक केली. जखमी दरोडेखोरासह दोघे मात्र फरार झाला. त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून लवकरच त्यांना पकडण्यात येईल,असे पोलिसांनी सांगितले.


पथकाला ३५ हजार बक्षीस
दोन राज्याचे पोलिस या टोळीच्या मागावर होते. पथकाने खतरनाक टोळी जेरबंद केली. या धडाकेबाज कारवाई बद्दल आयुक्तांनी पथकाला ३५ हजारांचे बक्षीस जाहीर केले. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.  तसेच सर्व पोलिसांचे कौतुकही करण्यात आले.

‘धैर्य ’ने दिली टक्कर
पोलिसांच्या पथकातील उपनिरिक्षक धर्यशिल घाडगे यांनी या टोळीचा धर्याने प्रतिकार करत टोळी जेरबंद केली. विशेष म्हणजे एका दरोडेखोराने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. मात्र, त्यांनी धैर्य दाखवत पथकासह स्वत:चा बचाव करत एकास जागेवर पकडले. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

टोळीवर मोक्कांंतर्गत कारवाई : नांगरे पाटील
टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा तात्काळ प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. टोळीवर तब्बल ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या हरदिपसिंग बबलू टाक (रा. जालना) याच्यावर महाराष्ट्र, तेलंगणा, राज्यात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, आर्म अॅक्ट चे तब्बल ३९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...