आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
पिंप्राळा रेल्वेगेट परिसरातील आनंदनगर येथे डॉ. मधुसूदन बी. नवाल यांचा दुमजली बंगला आहे. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता डॉ.नवाल हे पत्नी सुमती, मुलगा डॉ.अनिष, सून डॉ. शिल्पा व ऋषी आणि सिद्धांत या दोन नातवांसह शिर्डी येथे गेले होते. बंद बंगल्याच्या सुरक्षेसाठी १४ रोजी रात्री आरिफ शहा तर १५च्या रात्री नितीन पाटील यांना बंगल्यात झोपण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, १६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या सुमारास चाेरट्यांनी बंगल्याचे तार कंपाउंड आेलांडून स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी या दरवाजाला मोठे छिद्र पाडले आहे. त्यातून आत जाऊन चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील चार खोल्यांमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. चाेरट्यांनी तीन खाेल्यांच्या दरवाजांना कुलूप असताना देखील दरवाजे अक्षरश: अर्धे तोडले अाहे. त्यानंतर खाेलीतील कपाट फोडून त्यातील १ लाख २५ हजार राेकड, साडेपाच लाखांचे साेन्याचे दागिने, ७५० यूएस डाॅलर (६० हजार रुपये) असा ७ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
शहरात पहिल्यांदाच अशा पद्धतीने चाेरी; दुपारी २.४५ वाजता उघडकीस अाली घटना
चोरट्यांनी डॉ.नवाल यांच्या घरातील दरवाजे तोडले, स्क्रू ड्रायव्हर, चिमटा अशा वस्तू वापरुन कपाटे फोडली. जळगाव शहरात पहिल्यादाच अशा पद्धतीने चाेरी झााली अाहे. गुरूवारी दुपारी २.४५ वाजता डॉ.नवाल यांच्याकडे काम करणाऱ्या संगीताबाई थोरात घरी आल्या. त्यांनी तुटलेला दरवाजा पाहून शेजारी राहणाऱ्या डॉ.नवाल यांच्या बंधूंना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी डॉ.नवाल यांच्या बंगल्यात येऊन चौकशी केली असता चोरी झाल्याचे समजले. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक मनोज वाघमारे, रवी नरवाडे, राजेश मेंढे, नाना तायडे, अलताफ पठाण यांच्यासह पथकाने डॉ.नवाल यांच्या बंगल्याची पाहणी करुन माहिती घेतली. दरम्यान, गुरूवारी भरदुपारी चाेरट्यांनी नवाल यांचा बंगला फाेडल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.