राज्याचे माजी पोलिस / राज्याचे माजी पोलिस महासंचालकांचे घर फोडले, सोने- चांदीचे दा‍गिने लंपास, नोकर बेपत्ता

दिव्य मराठी वेब टीम

Jan 14,2019 04:25:00 PM IST

नागपूर- राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या धरमपेठ भागातील घरात डल्ला मारला. सोने-चांदीच्या दागिन्यांसह चोरट्याने रोख रक्कमही लंपास केली आहे. चक्रवर्ती यांच्या घरी काम करणारा नोकर बेपत्ता आहे. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आहे.

मिळालेली माहिती अशी की, नागपूरच्या धरमपेठ भागातील झेंडा चौक परिसरात प्रबीरकुमार चक्रवर्ती हे राहातात. चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर देवघर आहे. सकाळी नियमितपणे पूजा करण्‍यासाठी आलेल्या पुजारीला देवघरातून सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिस चोराचा शोध घेत आहेत.

दरम्यान, नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन आहे. नागपूर शहरात खुन, दरोडा आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

X
COMMENT