आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मठ तांडा येथे शस्त्राचा धाक दाखवत दरोडा, चोरट्याच्या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड/ वडीगोद्री  - पती, पत्नी अंगणात झोपलेले असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत असल्याचे पाहताच पतीने दरोडेखोरांवर हल्ला केला असता चोरट्यांनी शस्त्रांनी वार करुन लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना अंबड तालुक्यातील मठ तांडा येथे गुरुवारी मध्यरात्री रात्री घडली. संजय राठाेड असे जखमीचे नाव आहे.


मठ तांडा येथील गुलाब लक्ष्मण जाधव यांच्या घरी चोरी करुन त्यामध्ये चोरट्यांनी गुलाब जाधव व त्यांचा मुलगा विलास गुलाब जाधव यांचे सॅमसंग कंपनीचे दोन मोबाइल चोरल्यानंतर पाचशे मीटर अंतरावर संजय मुरलीधर राठोड यांच्या पत्नी शांताबाई यांना दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून मंगळसूत्र चोरून नेण्याचा प्रयत्न केला असता संजय राठोड यांनी मंगळसूत्र चोरणाऱ्या एका दरोडेखोरास प्रतिकार करण्यासाठी व त्याला मिठ्ठी मारुन पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु सोबतच्या तीन दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केला. चाकूचा वार त्यांनी हातावर झेलल्यानंतर त्यांनी पायावर वार केले. दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने संजय राठोड यांच्या दोन्ही पायावर हल्ला चढवून त्यांचे दोन्ही पाय निकामी केले. हल्ल्याचा आवाज ऐकून संजय राठोड यांचे घरात झोपलेले दोन्ही मुलांनी आरडाओरडा सुरू केल्याने तेथून दरोडेखोरांनी पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.  त्यांच्यावर संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. 


उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी. शेवगन, गोंदी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच जालना येथील श्वानपथक व ठसे तज्ञांस पाचारण केले. श्वान दोदडगाव शिवारातील अरुण रत्नपारखे यांच्या शेततळ्याजवळ आले. श्वान शहापूर ते बारसवाडा अर्धा रस्त्यावर घुटमळले.