आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरिअरवाला निघाला चोर; दरवाजा उघडताच वृद्ध महिलेला केली मारहाण, लाखोंची केली लूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- करधनी परिसरात एका वृद्ध महिलेला मारहाण करत तिच्या घरातून दाग-दागिने आणि लाखो रुपयांची लूट झाल्याची घटना घडली आहे. संतोष अग्रवाल (वय55) असे या वृ्द्धमहिलेचे नाव आहे. चोरी केल्यानंतर चोर घटनास्थळावरुन पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची कारवाई सुरु केली आहे.

 

कुरिअर देण्याच्या बहान्याने घुसले घरात

पोलिसांनी सांगितल्यानुसार, संतोष या घरी असताना दुपारच्या सुमारास दोन तरुण स्कुटीवरुन त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी कुरिअरचे बहाने करुन घराचा दरवाजा वाजवला. संतोष यांनी दरवाजा उघडताच या दोन तरुणांनी घरात घुसून संतोष यांना मारहाण सुरु केली. काही समझायच्या आतच चोरांनी संतोष यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून हातपाय बांधले. त्यानंतर 10 मिनिटांत घरातील दाग-दागिने आणि तीन लाखांची रोकड लुटून ते पसार झाले. संतोष यांना एक मुलगा असून त्यांचे पती एका कंपनीमध्ये अकाउंटंट आहे. घटनेदरम्यान दोघेही कामावर गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

> तपासात समोर आल्यानुसार, ते चोर दोन दिवसांआधीही संतोष यांच्या घरी आले होते. परंतु त्या दिवशी घरी त्यांचा पती आणि मुलगा असल्याने दोघेजण परत गेले होते. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून त्यांच्याविरोधात काही ठोस पुरावे हाती लागल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...