आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुटुंब लग्न समारंभासाठी गेल्याची संधी साधून घरफोडी; दीड तोळे सोन्यासह 65 हजारांचा ऐवज लांबवला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लग्न समारंभासाठी नाशिक येथे गेलेल्या कुटुंबीयांकडे झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दीड तोळे सोन्याचे दागिने असा ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. शेजाऱ्यांनी कळवल्यानंतर शुक्रवारी ही घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. 

 

ज्ञानदेवनगरातील सुनंदिनी पार्कमध्ये राहणारे जितेंद्र शांताराम शिंपी हे ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुटुंबीयांसह मावस मेव्हणीच्या लग्न समारंभानिमित्त घर बंद करून नाशिक येथे गेले होते. २ जानेवारी रोजी शिंपी यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने मोबाइलव्दारे संपर्क साधला. मुख्य दरवाजाचे कुलूप तुटले असून चोरी झाल्याबाबत संशय व्यक्त केला. शिंपी यांनी तातडीने विठोबानगर येथे राहत असलेल्या त्यांच्या लहान भावाशी मोबाइलव्दारे संपर्क साधला. त्यांना चोरी झाल्याबाबत खात्री करण्यास सांगितले. त्यांचे भाऊ प्रमोद शिंपी हे सुनंदिनी पार्क येथील घरी गेले. त्यांना मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप व मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. मागील बेडरूममधील दोन्ही कपाटातील आतील लॉक तुटलेले असून घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याबाबत प्रमोद यांनी कळवले. ३ जानेवारी रोजी नाशिक येथून विवाह समारंभ आटोपून शिंपी कुटुंबीय घरी आले. मुख्य दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी टॉमीव्दारे तोडलेले होते. तसेच दोन्ही कपाटांचे लॉकर तोडून त्यामधील रोख ३० हजार रुपये, १४ हजार रुपयांची ७ ग्रॅम सोन्याची अंगठी, ६ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅमची अंगठी व १५ हजार रुपये किमतीच्या लहान मुलीच्या वाढदिवसाच्या ७ अंगठ्या असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.जितेंद्र शिंपी यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.