आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वैजापूर- औरंगाबाद येथील कंपनीत माल घेण्यासाठी जात असलेल्या एकाला कारमधून आलेल्या दोघांनी रस्त्यात अडवून त्याच्या ताब्यातील १० लाखांचा ट्रक व मोबाइल असा एकूण १० लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावर तालुक्यातील शिवराई शिवारात शुक्रवारी पहाटे घडली.
नाशिक येथील एका वाहतूक कंपनीचा चालक अवधेश रामदयाल बिशकर्मा हा त्याच्याकडे असलेला बारा चाकांचा ट्रक (एपी-२६ टीएफ-४९४८) घेऊन औरंगाबादला जात होता. शिवराई शिवारात एका गतिरोधकाजवळ वाहन हळू चालत असताना पाठीमागून विना क्रमांकांची एक निळ्या रंगाची कार अचानक समोर आली. त्यामुळे अवधेशने ट्रक थांबविला. त्यावेळी या कारमधून ३० ते ३५ वर्षांचे दोघे जण खाली उतरले. त्यांनी अवधेशला खाली उतरून कारमध्ये बसलेल्या साहेबांकडे येण्यास सांगितले, परंतु तो खाली उतरत नसल्याने दोघेही ट्रकमध्ये चढले. यातील एकाने त्याच्याकडील मोबाइल काढून घेतला तर दुसऱ्याने स्टेअरिंगवरून बाजूला लोटत ट्रक सुरु केला व औरंगाबादच्या दिशेने निघाले. थोडे दूर जाताच त्याने हा ट्रक आतल्या बाजूला वळविल्याने अवधेश घाबरला व त्याने तत्काळ ट्रकमधून बाजूच्या शेतात उडी मारली. त्यानंतर ते दोघेजण ट्रक व मोबाइल घेऊन पसार झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.