घटनांदूरमध्ये घरफोडी; शिक्षक / घटनांदूरमध्ये घरफोडी; शिक्षक दांपत्य झोपले असल्याची संधी साधत चोरट्यांनी 40 हजारांचा ऐवज केला लंपास

Jan 09,2019 11:40:00 AM IST

वाशी- भूम तालुक्यातील घटनांदूर येथील व्यवसायाने शिक्षक असलेले शिवराम देविदास पवार व त्यांची पत्नी हे दांपत्य रविवारी (दि.६) रात्री जेवण करून झोपले असता चोरट्यांनी मध्यरात्री दोन वाजता घरफोडी करत ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शिक्षक दांपत्य झोपले असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले २२ हजार किमतीचे एक सोन्याचे नेकलेस, १८ हजार किंमतीचे एक गंठण आणि एक मोबाइल असा ४० हजार ५०० रुपयांच्या मालावर हात साफ करून पोबारा झाले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर शिवराम पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरुन वाशी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राऊत करत आहेत

X