आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : सातारा परिसरात मेडिकल फोडले, CCTV तोडला पण चोरटे कॅमेऱ्यात कैद, दहा ते पंधरा हजारांचा माल पळवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी सातारा परिसरातील मेडिकल फोडून जवळपास 10 ते 15 हजारांचा मुद्देमाल पळवला. मेडिकलमध्ये आणि बाहेर सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले होते, त्यामुळे चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले. 


चाटे स्कूल रस्त्यावरील पृथ्वी नगर येथील गौरी मेडिकलमध्ये चोरीचा हा प्रकार घडला आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकान फोडले. याप्रकरणी सचिन विठ्ठल व्यवहारे यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून 10 ते 15 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवल्याची तक्रार दिली आहे. 

कॅमेरा तोडला 
मेडिकलमध्ये शिरल्यानंतर चोरट्यांनी कॅमेरा तोडला पण त्याआधी त्यांचे चेहरे कॅमेऱ्यात टिपले गेले होते. एका चोराने चेहरा ओळखता येऊ नये म्हणून  तोंडावर रुमाल बांधलेला होता तर एकाने टोपी घातलेली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...