आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवगण राजुरीच्या गणेश मंदिरातील दानपेटी चाेरीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील प्रसिद्ध गणेश मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी हात साफ केला. एका दानपेटीसह मंदिर परिसरातील एक दुचाकी लंंपास करण्यात आली. काही नागरिकांना आवाजामुळे जाग आल्याने दुसरी दानपेटी पळवण्याचा डाव फसला. दरम्यान, या घटनेमुळे राजुरीत खळबळ उडाली असून पोलिसांच्या पथकांनी भेटी दिल्या आहेत.


बीड तालुक्यातील राजुरी गाव गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. गावात ९ ठिकाणी गणपती असल्याने नवगण राजुरी अशी गावाची ओळख आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात मुख्य गणेश मंदिर असून एकाच शिळेत चार दिशांना चार गणेशमूर्ती आहेत. राज्यभरातून लोक इथे दर्शनसाठी येत असतात. शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी या मंदिरात चोरी केली.


चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी ५० ते ६० किलो वजनाची एक दानपेटी लंपास केली यात सुमारे ३० ते४० हजार रुपये होते. दुसरी दानपेटी वाहनात टाकताना परिसरातील काही नागरिकांना आवाजामुळे जाग आल्याने दुसरी दानपेटी टाकून चोरट्यांनी पोबारा केला. एक दुचाकीही चोरट्यांनी लंपास केली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी भेट दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, दरोडा प्रतिबंधक पथक, श्वान पथक, ठसेतज्ञांनी पाहणी केली.