आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यात तिघांच्या गळ्याला चाकूचा धाक दाखवून लुटला ऐवज, महिला जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरोड्यांमुळे माढ्यात भीतीचे वातावरण

संदीप शिंदे 

माढा(सोलापुर)  - माढा शहरात चोर्याचे सत्र सुरुच असताना बुधवारी पहाटे तिन ते चार वाजताच्या सुमारास शहरात चोरट्यांनी तिन ठिकाणी धुडगुस घातलाय.भुमि अभिलेख चे निवृत्त कर्मचारी कुमार चवरे यांच्या घरावर दरोडा घातलाय. पुन्हा एकदा चोरट्यांनी माढा पोलिसांच्या समोर आव्हान उभे केलंय.तिन घटना मध्ये जवळपास सहा लाखांचा ऐवज लंपास झालाय.


चवरे यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी कोंयडा तोडुन घरात प्रवेश करीत कपाटातील ऐवज नेत असताना राधिका चवरे या जागा झाल्या.त्यांनी आरडा ओरडा करताच त्यांच्यासह पती विनायक,मुलगा समर्थ या तिघांच्या गळ्याला चाकू लावुन आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकी चोरट्यांनी दिली.

चोरट्यांनी ऐवज घेऊन पोबारा करित असताना राधिका या त्यांच्या मागे पळाल्या मात्र चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात काठी मारल्याने त्या जखमी झाल्या.अन् चोरट्यांनी धुम ठोकली. चोरी करीत असताना चोरट्यांनी शेजारील घरांना कड्या घातल्या होत्या.या दरोड्याच्या घटनेत  सोन्यांचा दागिने व रोख असा  तिन लाख १४ हजांर ३०० चा ऐवज लंपास झाला आहे.तर दुसरी घटना शहरातील रोकडोबा मंदिरा समोरील मिठु वाघ यांच्या घरी घडली.


दरवाज्याचा कडी कोंयडा तोडुन कपाटातील दोन लाख रक्कमेसह सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने लांबवले.या वेळी चोरट्यांनी घरातील जर्मनचे डबे रिकामे करुन  घरात  आणखी काय सापडते का याचा शोध घेत घरात राडा घातला. मिटु वाघ यांच्या पत्नी व मुलगा सचिन हे शेजारील खोली मध्ये झोपले होते.तर मिठु वाघ हे घरासमोरील पत्रा शेड मध्ये झोपले होते.
वाघ यांनी प्लाट च्या खरेदीसाठी उसनवारीने पैसे घेतले होते तसेच टॅकट्रर च्या डपंर विकल्याचे पैसे कपाटात ठेवले होते.त्या पैश्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला.चोरी झाल्यानंतर चोरट्यांनी घरा बाहेर थांबुन  पाणी पिऊन जात तांब्या  टाकला.दोन लाख रोकड सह अन्य  सोन्याचे व चांदीचे  दागिने लंपास झालेत.सराफ बाजारपेठेतील विठ्ठल कासार यांच्या दुकानाच्या गल्यातील तिनशे रुपयांची रोकड घेऊन दुकानातील बागड्या अस्तव्यस्त टाकल्या.बुधवारची पहाट माढेकरांसाठी भयभीत अशीच ठरली.वाढत्या चोरीच्या घटना होत असताना चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात माढा पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत.शहरवासिया मध्ये भितीचे वातावरण संचारले आहे. श्वान पथक व फिंगर प्रिट पथकास पाचारण करण्यात आले आहे.पोलिस उप अधिक्षक डाॅ सिध्देश्वर भोरे यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...