आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणकबागेत दाेन घरे फाेडली; दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास, परिसरात भीती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुसावळ  -शहरातील माणकबागेतील दाेन घरांचे कडीकाेंडे ताेडून चोरट्यांनी हातसफाई केल्याची घटना सोमवारी सकाळी उघड झाली. याच परिसरात तिसऱ्या घराचे कुलूप न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. दोनपैकी एका घरातून १ लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. तर दुसऱ्या घराचे मालक बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातील चोरीचा अद्याप उलगडा झाला नाही. 


माणकबागेतील रहिवासी तथा निवृत्ता भीमराव तुकाराम सुरवाडे त्यांच्या पत्नीला घेऊन शनिवारी (दि.५) पुण्यातील हाॅस्पीटलमध्ये गेले होते. ते रविवारी परत आल्यानंतर शहरातील लक्ष्मीनारायणनगरात त्यांच्या सासरवाडीला थांबले हाेते. साेमवारी सकाळी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आढळले. त्यामुळे शेजाऱ्यांनी सुरवाडे यांना फोनवरून माहिती कळवली. सुरवाडे यांनी तात्काळ घरी येऊन पाहणी केली. घरातील दारवाजाचा कडीकाेंडा तोडून चाेरट्यांनी बेडरूममधील साहित्याची फेकाफेक केलेली दिसली. तसेच कपाटातील ३५ ग्रॅम वजनाचा राणीहार, ५ ग्रॅमचा नेकलेस, १५ हजार रूपये किमतीचे कानातील टाॅप्स व पाच हजार रूपये राेख असा एेवज चोरांनी लांबवल्याचे समोर आले. 

 

सुरवाडे यांच्या घराच्या परिसरातच भागवत दामू फेगडे यांच्या बंद घराचा कडीकाेंडा तोडून चोरट्यांनी साहित्याची फेकाफेक केली. मात्र, फेगडे कुटुंबिय बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातील चोरीचा उलगडा झालेला नाही. ते परत आल्यानंतरच घरातून चोरीला गेलेल्या ऐवजाची माहिती समोर येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. चोरीमुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात भीमराव सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पाेलिस उपनिरीक्षक के.टी. सुरळकर पुढील तपास करत अाहेत. 

 

सीसीटीव्ही फुटेज तपासणार 
चाेरीप्रकरणी त्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जाणार आहे. चाेरटे बाहेरगावचे असावेत असा अंदाज अाहे. शहरातील संशयीतांची चाैकशी केली जाणार अाहे. - गजानन राठाेड, डीवायएसपी, भुसावळ 

 

मजबूत कुलपामुळे चोरी टळली 

चाेरट्यांनी याच परिसरातील संजू कांबळे यांच्याही घराचे कुलूप ताेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. विशेष म्हणजे चोरट्यांचे लक्ष्य ठरलेल्या तिन्ही घरांसमोर पथदिव्यांचा प्रकाश होता. तरीदेखील चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे. 


तज्ज्ञांनी घेतले ठसे 
चाेरीची माहिती मिळाल्यावर डीवायएसपी गजानन राठाेड यांनी माणकबाग परिसरातील घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून तापी नदीकडील मार्ग दाखवला. तसेच ठसे तज्ज्ञांनी सुरवाडे यांच्या घरातील काही वस्तूंवरील ठसे घेतले. 


अामदारांनी केली पाहणी 
अामदार संजय सावकारे यांनीदेखील सुरवाडे यांच्या घरी जाऊन पाहणी केली. तसेच डीवायएसपी राठोड यांच्याशी तपासाबाबत चर्चा केली. एकाच परिसरात चोरट्यांच्या हालचाली झाल्याने, भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली. 

 

बातम्या आणखी आहेत...