आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरखेड येथे चाेरी; आठ तोळे सोने लंपास; गांगुर्डे कुटुंब परगावी; चाेरट्यांनी साधली संधी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- तालुक्यातील पिंपरखेड येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चाेरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ८० ग्रॅम सोने, सहा भार चांदीचे दागिने व ४० हजार रुपये रोख असा दाेन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. 

 

माहितगार चोराने लॉक असलेले लोखंडी कपाट घरातील चाव्याच्या सहाय्याने उघडून दागिने लंपास केले. जमीन खरेदी-विक्रीचे काम करणारे शिवाजी धुडकू गांगुर्डे हे आपल्या कुटुंबासह पिंपरखेड येथे राहतात. त्यांचा मुलगा व मुलगी शिक्षण तसेच नाेकरीनिमित्त पुण्यास वास्तव्यास असल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून ते घराच्या दरवाजाला कुलूप लावून पुणे येथे गेले होते. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता त्याच्या मावसभावाचा मुलगा विकास याने फोन करुन कळवले की, तुमच्या घराच्या दरवाजा उघडा आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने पिंपरखेड गाठले. गावी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता. लोखंडी कपाटातील व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटात त्यांनी ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व सहा भार चांदीचे दागिने, तसेच ४० हजार रूपये रोख असा ऐवज ठेवलेला होता. त्यांनी दागिने व रक्कमेचा कपाटात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात शिवाजी गांगुर्डे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला. 
या कपाटातून दागिने लंपास केले. 

 

चाव्यांच्या सहाय्याने उघडले कपाट 
घरातील किचन रुममधील डब्याच्या मागे ठेवलेल्या चाव्यांच्या सहाय्याने चोरट्यांनी कपाट उघडून कपाटातील हा दाेन लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची खात्री झाली. याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक जगदीश मुलगीर, हवालदार विभिषण सांगळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. 
 

बातम्या आणखी आहेत...