आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा घरांना बाहेरून लावल्या कड्या; दोन घरे, सोन्याचे दुकान अन‌् मेडिकल फोडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडीगोद्री- एकीकडे जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातच ग्रामीण भागांमध्ये चोऱ्या, दरोड्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली, तर दुसरीकडे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले अनेक गुन्ह्यांतील आरोपी ताब्यात घेता आलेले नाहीत. दरम्यान, महामार्गालगत असलेल्या अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे चोरटे सहा घरांना कड्या लावून गल्लीत घुसले. यानंतर तीन घरे फोडल्यानंतर एक सोन्या-चांदीचे, तर एक मेडिकल दुकान फोडून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 

जिल्ह्यात सातत्याने गुन्हे वाढत चालले आहेत. त्यातच पोलिसांच्या तपासाला संथगती राहत असल्यामुळे अनेक चोऱ्या, दरोड्यांच्या गुन्ह्यांतील आरोपी अद्यापही फरार आहेत. तीन दिवसांपूर्वीच घनसावंगी तालुक्यातील मूर्ती गावात ८ जानेवारी रोजी मध्यरात्री तीन घरे फोडून १ लाख १० हजारांचा ऐवज लांबवला होता. या घटनेतही पोलिसांकडून काेणताच तपास झालेला नाही. तसेच चार महिन्यांपूर्वी राजाटाकळी या गावातसुध्दा चोरट्यांनी सात ठिकाणी दरोडे टाकून मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास केला होता. या प्रकरणातही पोलिसांना तपास लावलेला नाही. दरम्यान, अंकुशनगर हे सोलापूर-औरंगाबाद महामार्गाला लागून आहे. 

 

या ठिकाणी चोरट्यांनी महामार्गाहून आत प्रवेश केला. घरातून कुणी बाहेर येऊ नये म्हणून गावात घुसतानाच चोरट्यांनी सहा घरांच्या बाहेरून कड्या लावल्या. यानंतर तीन घरांमध्ये घुसून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पळवला आहे. 

 

यांचा ऐवज लंपास 
अंकुश लक्ष्मण भिसे यांच्या घरातून एकदाणी, गंठण, रोख ४० हजार, अमर चाऊस, वैभव दहिवाळ, डॉ. लहाने यांच्या मेडिकलच्या दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 

 

फिंगर प्रिंटने तपास 
आरोपींना ताब्यात घेण्याच्या तपासासाठी श्वान, फिंगर प्रिंटचे यज्ञ या ठिकाणी आले होते. शटर, दुकानातील खुर्चीसह ड्रॉवर, गल्ला, घरांमधील कपाटाच्या फिंगर चाचण्या घेतल्या आहेत. 

 

पोलिसांनी केला पंचनामा 
पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे मगरे, बगाटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या ठिकाणी चोरटे कसे आत आले, याबाबत काही वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 

 

तपास सुरू 
चोरीची घटना घडल्यानंतर पंचनामा केला आहे. याप्रकरणी चोरट्यांचा शोध सुरू आहे. लवकरच या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात येणार आहे. हनुमंत वारे, पोलिस उपनिरीक्षक, गोंदी 
 

बातम्या आणखी आहेत...