आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड शहरानजीक गोरे वस्तीवर दरोडेखोरांनी घातला धुमाकूळ, जगताप दांपत्यास केली मारहाण,५० हजारांची लूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - बीड शहरापासून जवळच असलेल्या  गोरे वस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत  एका कुटुंबावर हल्ला करून  ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी (दि. ११) पहाटे ही घटना घडली असून जखमींवर  बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बीड-नगर रस्त्यावरील गोरे वस्तीवर अशोक जगताप यांचे कुटुंबीय  वास्तव्यास आहे. त्यांच्या आई मीना  जगताप व वडील लोभाजी जगताप हे दरोडेखोरांच्या  मारहाणीत जखमी झाले. जगताप कुटुंबीय रविवारी रात्री जेवणानंतर झोपी गेले होते. सोमवारी पहाटे दहा दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करून जगताप यांच्या आईच्या गळ्यातील दागिने , पाकीटातील रोख साडेपाच हजार रुपये आणि  पॅन्डमधील रोख तीन हजार रुपये, एटीएम कार्ड, मोबाइल असा असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. 

जखमी दांपत्यावर रुग्णालयात उपचार
गोरे वस्तीवरील लोभाजी जगताप यांनी दरोडेखोरांचा  प्रतिकार केला.  दरोडेखोरांनी दांपत्यावर   शस्त्राने हल्ला केला. जखमी दांपत्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक भारत राऊत, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव, ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक सुजित बडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

किरायादाराच्या मुलाचे हातपाय बांधले
दरोडेखोरांनी जगताप यांच्याकडे किरायादार म्हणून राहणाऱ्या आशा मोराळे यांच्या घरातही प्रवेश केला. त्यांचा मुलगा विकास याचे हातपाय बांधून त्यांनी लूटमार केली. त्यानंतर दरोडेखोरांनी धूम ठोकली. दरम्यान रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमी कुटुंबाने काही व्यक्तींवर संशय घेत हा प्रकार पुर्ववैमनस्यातला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शिवाय वर्षभरापुर्वी कुटुंबावर असाच हल्ला असल्याचे जखमींचे म्हणणे आहे. दुपारपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.