आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात धावत्या रेल्वेत अडीच कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, चोर उडी टाकून पळाला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्तोडगड- बांद्रा-उदयपूर रेल्वेत सोमवारी सकाळी स्लीपर कोचमध्ये झोपेत असलेल्या एका प्रवाशाच्या उशाखाली ठेवलेली आठ किलो सोन्याची सुमारे अडीच कोटी रुपयांची बॅग चाेरल्यानंतर चोरट्याने धावत्या रेल्वेतून खाली उडी मारली. ही घटना राजस्थानच्या निंबाहेडाजवळ घडली. तेव्हा रेल्वेचा वेग कमी होता. चोरट्याला या बॅगमध्ये किमती ऐवज असावा, याची कल्पना होती. हा चोर मुंबईपासून प्रवाशाच्या मागावर असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात माहिती अशी की, मुंबईतील रणजी स्ट्रीट जोहरी बाजार, चर्नी रोडवर राहणारा विपुल विनोद रावल (२३) व नरेंद्र प्रेमाराम टेलर (२८) हे दोघे यश गोल्ड कंपनीत सेल्समन आहेत. दोघेही बांद्रा-उदयपूर रेल्वेने उदयपूरला येत होते. विपुल व नरेंद्र यांनी रेल्वे पोलिसांना (जीआरपी)सांगितले, ते स्लीपर कोच एस-४ मध्ये होते. नरेंद्र मधल्या सीटवर झोपलेला होता. नरेंद्रच्या उशाखाली बॅग होती. यात अडीच कोटी रुपये किमतीचे ८ किलो सोन्याचे दागिने होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास रेल्वे हळू-हळू चित्तोडगडकडे चालली होती. करधानाजवळ एक तरुण चोरट्याने नरेंद्रच्या उशाखाली असलेली बॅग उचलून पलायन केले. नरेंद्र जागा झाला. तो चोरट्यामागे धावला. परंतु त्याने रेल्वेतून खाली उडी टाकली आणि पळून गेला. 

 

रेल्वेत कोणा प्रवाशाकडे आठ किलो सोने म्हणजे अडीच कोटींचा ऐवज असणे, ही एखादीच घटना असते. कोचमध्ये व रेल्वेत अन्य बॅगाही होत्या. चाेरट्यांनी नेमकी हीच बॅग उचलली. याचा अर्थ त्याला यात खूप ऐवज असावा, याची कल्पना होती. मंुबईहून मोठे व्यापारी अथवा कंपन्यांचे प्रतिनिधी राजस्थानातील मेवाडमध्ये विकण्यासाठी याच रेल्वेतून सोने नेतात. याआधीसुद्धा या दोघांनी सोने येथे नेले होते. चोरटा मुंबईतून रेल्वेत बसला अथवा त्याला पक्की खबर मिळाल्यावरून मधूनच तो या डब्यात आला. किंवा त्यांची मिलीभगत असावी. जीआरपी या सर्व शक्यतांचा विचार करत आहे.

 

महत्त्वाचा प्रश्न- चोरट्यास होती ऐवजाची कल्पना 
पहाटे साडेपाचच्या सुमारास रेल्वे हळू-हळू चित्तोडगडकडे चालली होती. नरेंद्रच्या आरडाओरडीनंतर त्याचा सहकारी विपुलने चेन ओढली. तोपर्यंत रेल्वे पोलिस दलाचे (आरपीएफ)चे जवान आले. त्यांना चोरटा सापडला नाही. आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या चौकशीत निंबाहेडा येथून रेल्वे निघाल्यानंतर काही वेळातच दोन वेळा चेन ओढली गेली. यावरून रेल्वे पोलिस दल व फिर्यादींनी परस्परांवर दोषारोप केले. जीआरपीनुसार, रेल्वेत रेल्वे पोलिस दलाचे चार जवान होते. पहिल्यांदा चेन ओढली तेव्हा चौघांनीही बॅटरीच्या उजेडात हे दोघे खिडकीतून पाहत असल्याचे पाहिले. जवान त्यांच्याजवळ आले तेव्हा आणखी एकदा चेन ओढली गेली. जीआरपीनुसार आरपीएफचे जवान व गेटमनकडे चौकशी केली तेव्हा दोघांनीही सांगितले, गाडीतून खाली कोणी उतरताना दिसलेच नाही. चोरीची वेळ, सोन्याची किंमत व चोरी कशी झाली, याची फिर्यादीनेही दिलेली माहिती संभ्रम निर्माण करणारी आहे. फिर्यादी नरेंद्र म्हणतो, पहिल्यांदा चेन ओढली तेव्हा आरपीएफचे जवान आले होते. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही अन् रेल्वे निघाली. पुन्हा आम्ही चेन ओढली तेव्हा आरपीएफने सांगितले, चित्तोडला गेल्यावर फिर्याद द्यावी लागेल. माझा मोबाइल त्या बॅगेत होता. तत्काळ तो ट्रेस केला असता तर चोरट्याचा ठावठिकाणा लागला असता. रेल्वेतील अन्य एका महिलेनेही तिची बॅग चोरीस गेल्याचे म्हटले आहे. मुंबई पश्चिमचा रहिवासी शोएब यानेही नातेवाइकाचे दीड लाखाचे सामान गेल्याचे सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...